31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात गुप्तगू, सरकार स्थापनेबाबत चर्चा

शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात गुप्तगू, सरकार स्थापनेबाबत चर्चा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  सत्तेत कुणाचा किती वाटा यावरून भाजप व शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्तेत हवा तसा वाटा देण्याच्या मनस्थितीत भाजपचे नेते नाहीत. त्यामुळे नाराज असलेले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पाठींब्याने शिवसेना सरकार स्थापण्यास इच्छूक आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतेही शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. पण काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची सहमती मिळणे आवश्यक आहे. या सगळ्या बाबी शरद पवार यांनी जुळवून आणाव्यात अशी इच्छा उद्धव यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. पवार दोन्ही काँग्रेसचा पाठींबा मिळवून सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी उद्या सकाळपर्यंत ते वाट पाहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पवार यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या निवडक नेत्यांसोबत आज एक बैठकही घेतली होती. या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काय करता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठींबा देण्यास सोनिया गांधी यांचा नकार असल्याचे बोलले जात आहे. पण भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठींबा द्यावा, अशी राज्यातील खुद्द काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नेत्यांचीही इच्छा आहे. शरद पवार यांनी आग्रह केल्यास सोनिया गांधी सुद्धा सेनेला पाठींबा देण्यास तयार होऊ शकतील असाही कयास बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यातील चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी