35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमुंबईशिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  लवकरच गोड बातमी मिळेल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हीच गोड बातमी मुनगंटीवार यांना द्यायची असेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी हा दावा केला.

राज्यात शिवसेनेचे सरकार यावे अशी राज्यातील तमाम जनतेची, शेतकऱ्यांची इच्छा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील उद्या राज्यपालांना भेटणार असतील तर चांगलेच आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी 145 आमदारांच्या यादीसह भेट घेतल्यास महाराष्ट्राला आनंद होईल, असा चिमटाही संजय राऊत यांनी यावेळी काढला.

राज्यपालांना आम्ही सुद्धा भेटलो होतो. रामदास आठवले, महादेव जानकर, विनोद तावडे हे सुद्धा भेटले होते. काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेतेही भेटले असल्याची कुत्सित टीका राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी उद्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ते आमदारांना मार्गदर्शन करतील, असे राऊत यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी