31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजमराठी महिलेवर अन्याय झाला तरी चालेल, पण अर्णव गोस्वामींना अटक करू नका...

मराठी महिलेवर अन्याय झाला तरी चालेल, पण अर्णव गोस्वामींना अटक करू नका : शिवसेनेचा भाजपला टोला

टीम लय भारी

मुंबई :  अर्णव गोस्वामींमुळे एका मराठी महिलेचे कुंकू पुसले गेले. ती विधवा झाली, तरीही या महिलेला न्याय मिळू नये. आम्ही दडपलेली प्रकरणे बाहेर काढू नयेत, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे का, असा सवाल शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे ( Shivsena asked question to BJP about Arnab Goswami ).

अर्णव गोस्वामी प्रकरणाचे स्पष्टीकरण देण्यासाठी अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार ताशेरे ओढले. सन २०१८ मध्ये अन्वय नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास त्यावेळच्या ( देवेंद्र फडणवीस ) सरकारने पूर्ण केला नाही. त्यामुळे अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक गेली दोन वर्षे न्याय मागण्यासाठी विविध ठिकाणी जात होत्या. त्यानुसार न्यायालयानेच या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी दिली होती ( Police reopen Arnab Goswami case ).

हे सुद्धा वाचा 

Arnab Goswami : ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी अटकेत

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

अन्वय नाईक यांनी आत्महत्या करताना चिट्टी लिहिली होती. त्यात अर्णव गोस्वामी याच्यासह फिरोज शाह व नितेश सारडा अशा एकूण तिघांना अटक केली आहे. गोस्वामीच्या अटकेचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा काहीही संबंध नाही, असेही परब म्हणाले.

अर्णव गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे त्यांचे नेते गळा काढत आहेत. महाराष्ट्रातील एका मराठी महिलेचे कुंकू पुसलं गेले. तिला विधवा केले. ती दोन वर्षे ओरडत आहे. पण ही चौकशी संशयास्पद पद्धतीने त्यावेळच्या सरकारने बंद केली. अर्णव गोस्वामीमुळे एक मराठी माणूस नाहक मेला आहे. तरीही अर्णव गोस्वामीला वाचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आटापीटा करीत आहेत.

अर्णब हा भाजपचा पोपट आहे. या पोपटात भाजपच्या नेत्यांचा जीव अडकला आहे ( Arnab Goswami is a parrot ). त्याला आता पोलिसांनी पिंजऱ्यात टाकले आहे. सन २०१८ मध्ये अन्वय नाईक प्रकऱण कुणामुळे दाबले गेले याची माहिती बाहेर येईल म्हणून भाजपच्या नेत्यांची पंचाईत झाली असल्याचे परब म्हणाले.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी