30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूजArnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती...

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

टीम लय भारी

मुंबई : पालघर येथील तीन जणांची गेल्या आठवड्यात हत्या झाली. या हत्येला ‘हिंदू’ असा धार्मिक रंग देत ‘भारत रिपब्लीक’ वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी आकांडतांडव केल्याने वाद चिघळला आहे. पण याच अर्णव गोस्वामी यांनी अन्याय केल्याची चिट्टी लिहून दोन वर्षांपूर्वी हिंदू असलेल्या एका मराठी उद्योजकाने आपल्या आईसह आत्महत्या केली होती. या माय लेकराने आत्महत्या केली तेव्हा अर्णव गोस्वामी याचे हिंदू प्रेम कुठे गेले होते असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

अन्वय नाईक व कुमूद नाईक असे या माय लेकरांचे नाव आहे. अन्वय नाईक हे इंटिरियर डेकोरेटिंगचा व्यवसाय करीत होते. नाईक यांच्याकडून गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी काम करून घेतले होते. त्या कामाचे 83 लाख रुपये गोस्वामी यांनी दिले नव्हते.

Coronavirus

गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्यासह फिरोज शेख व नितेश सारदा या दोन आरोपींनीही नाईक यांचे पैसे थकविले होते. त्यामुळे अर्णव गोस्वामी, शेख व सारदा या तिघांच्या नावांचा चिट्टीत उल्लेख करून अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आईनेही त्यावेळी आत्महत्या केली होती.

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी त्यावेळी गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्यासह तिघांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. एवढा गंभीर गुन्हा दाखल होऊन सुद्धा अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami ) यांना तेव्हा अटक झाली नव्हती हे विशेष.

‘देशात 80 टक्के हिंदू आहेत, आणि हिंदूंवर अत्याचार होतोच कसा’ असा गळा अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी त्यांच्या टिव्ही कार्यक्रमात काढला आहे. धसमुसळ्या पद्धतीने सादरीकरण केलेल्या या कार्यक्रमात गोस्वामी यांनी ‘हिंदू’चा पालनकर्ता असल्याचा मुखवटा परिधान करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

पण हिंदू व्यावसायिक असलेल्या अन्वय नाईक व त्यांच्या आईला गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्यामुळे आत्महत्या करावी लागली. अन्वय यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व मुलांवर संकट कोसळले. हिंदूंविषयी इतकी तळमळ होती तर गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी नाईक यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येऊ दिली असाही सवाल उपस्थित झाला आहे.

ही घटना घडली तेव्हा ‘माझ्या विरोधात रचलेला कट आहे. मी नाईक यांचे सगळे पैसे दिले आहेत’ अशी सारवासारव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा – अर्णव गोस्वामींवर गुन्हा

हे सुद्धा वाचा – शशी थरुर यांचा अर्णव गोस्वामींवर मानहानीचा दावा

अर्णव गोस्वामी काय म्हणाले होते या टिव्ही शोमध्ये ?

भारतात 80 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे. 80 टक्के लोकसंख्या सनातन धर्माला मानते. येथे हिंदू असणे, भगवे कपडे परिधान करणे पाप झाले आहे. मी विचारतो की, कोणत्या मौलवी व पाद्रीला मारले असते तर लोक शांत बसले असते का ? ईटलीवाली सोनिया गांधी गप बसली असती का ?

काँग्रेस पक्ष आणि रोमवरून आलेली सोनिया गांधी गप बसली नसती. आज ती गप आहे आणि मनातल्या मनात खूष आहे. कारण संतांना रस्त्यावर मारले गेले. तिथे त्यांचेच ( महाराष्ट्रात ) सरकार आहे. आता ती इटलीला एक अहवाल पाठवेल – जिथे माझे सरकार आहे, तिथे हिंदू संतांना मारले आहे. तिथून त्यांना वाहवा मिळेल की, बहुत अच्छा किया सोनिया गांधी अँटोनिया मायनो. लाज वाटायला पाहीजे या लोकांना. काय वाटते या लोकांना, हिंदू गप बसतील ?

सोनिया गांधींच्या बदनामी प्रकरणी अर्णव गोस्वामींविरोधात एफआयआर दाखल

सोनिया गांधी यांची बदनामी केल्याने देशभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते खवळले आहेत. अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र ( नागपूर ), छत्तीसगड व राजस्थान या तिन्ही ठिकाणी गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्यावर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. अनेक ठिकाणच्या पोलीस ठाण्यात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या विरोधात तक्रारी सादर केल्या आहेत.

संतप्त कार्यकर्त्यांचा गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला

गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये संतप्त वातावरण पसरले आहे. बुधवारी रात्री त्यांच्या गाडीवर एका बाईकस्वाराने बाटली फेकून मारली. या बाईकस्वाराच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियात गोस्वामींच्या निषेधाचा पाऊस

ट्विटर, फेसबुक व वॉटस्अपवरून गोस्वामी यांच्या विरोधात जोरदार निषेध नोंदविण्यात येत आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच पत्रकारांनीही गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पत्रकारितेचे नावाखाली अर्णव गोस्वामी भाजप सरकारची तळी उचलत आहेत, अशा आशयाचा भडीमार सोशल मीडियात सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

PawarSpeaks : पालघरमधील घटना निषेधार्हच, पण महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करणे अयोग्य

#PalgharLynchingTruth : फडणवीसांच्या काळात धुळ्यात 5, चंद्रपूरात एका गोसाव्याची हत्या झाली होती : शिवसेनेचे टीकास्त्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी