31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजगानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

टीम लय भारी

मुंबई:- ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळी दिनांक ६ रोजी निधन झालं आहे.त्या 92 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.लता दीदी यांची प्रकृती काल पुन्हा ढासळली होती,त्यांची प्रकृती चिंताजनक होती.( singer Lata Mangeshkar passed away)

गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ट्विट करत दिली माहिती

लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 7 लाखांची मदत!

‘Stalwart of Indian culture’: Narendra Modi, Ram Nath Kovind, other leaders pay tribute to Lata Mangeshkar

त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झालाय. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.

मात्र आज सकाळी 8 वाजता लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येतं आहे.  त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत होती .मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी