35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यखासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

टीम लय भारी

मुंबई : ‘करोना’च्या ( Coronavirus ) पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे धडाक्यात काम करीत आहेत. टोपे यांच्या या कष्टाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. ‘सुपरमॅन’ या शब्दांत खासदार सुळे यांनी टोपेंना शाबासकीची थाप दिली आहे.

चीनमध्ये ‘करोना’ उद्भवला तेव्हापासूनच महाराष्ट्रातील आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या होत्या. पुण्यात पहिल्यांदा ‘करोना’चे रूग्ण आढळल्यानंतर टोपे यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा हलवून जागी केली. आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स यांच्यासोबत मॅरेथॉन बैठका सुरू केल्या. जनजागृतीसाठी मोहिम राबविण्यास सुरूवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवाद साधून योग्य निर्णय तातडीने मार्गी लावले. उपाययोजनांसाठी निधी मंजूर करून घेतला.

बैठका, निर्णय घेणे आणि लोकांचे फोन स्विकारणे यांमुळे टोपे यांचा दिनक्रम कमालीचा व्यस्त झाला आहे. सकाळी सहा – सात वाजताच त्यांचा दिवस सुरू होतो. झोपायला रात्रीच्या 2 वाजतात. परदेशातून येणाऱ्या लोकांची विमानतळावरून माहिती घेणे, व तेथूनच त्यांना तपासणीसाठी पाठविणे. आरोग्य विभागाने 24 तासांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांशी स्वतः टोपे व त्यांचे अधिकारी संपर्कात असतात. गेल्या दहा दिवसांत टोपे यांचे ट्विटर अकाऊंटसुद्धा कार्यक्षम झालेले दिसत आहे. ट्विटरवरून ते ‘करोना’बाबतची माहिती देत आहेत.

महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आमचे ‘लय भारी’ ‘ट्विटर अकाऊंट फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा यांच्यासोबतही वारंवार व्हिडीओ कॉन्फरन्स घेत आहेत. आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीस व महसूल यंत्रणेचे सहकार्य वेळेतच मिळविण्यासाठी टोपे यांनी पाऊले टाकली.

जनजागृतीसाठी पुस्तिका प्रसिद्ध करण्याच्या सुचना केल्या, प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले. प्रसारमाध्यमांसमोर स्वतः येऊन ते वारंवार ‘करोना’बाबत लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. ‘करनो’चे गांर्भिर्य ओळखून टोपे यांनी धडाक्यात पाऊले उचलली. त्यामुळे इतक्या मोठ्या संकटात सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधकांना मिळालेली नाही. अशा प्रसंगात सामान्य लोकांमध्येही संताप उसळतो. पण ‘करोना’च्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणा जोरदार कामाला लागली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारप्रती लोकांमध्ये कुठेच राग दिसत नाही. उलट सरकारने केलेल्या सुचना लोकांकडून गांभिर्याने घेतल्या जात आहेत. सरकारी यंत्रणा पुरती सज्ज ठेवण्यासाठी राजेश टोपे यांची भूमिका मोठी आहे. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांनी टोपेंना ‘सुपरमॅन’ची उपमा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिवेशन संपल्यानंतर जवळपास सगळेच मंत्री आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. पण राजेश टोपे यांनी मुंबईतच तळ ठोकला आहे. रविवारीसुद्धा त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. सेव्हन हिल व कस्तुरबा रूग्णालयात जाऊन त्यांनी विलगीकरण कक्षाची पाहणी केली. डॉक्टरांशी संवाद साधला. ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही उणीव राहता कामा नये यासाठी दक्षता म्हणून टोपे मुंबईत थांबले असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द

Breaking : मंत्रालय प्रवेश सामान्य लोकांसाठी बंद, बाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांवरही निर्बंध, बैठकाही रद्द

‘करोना’ टाळण्यासाठी काय करावे ? सरकारने जारी केली माहिती पुस्तिका

‘कोरोना’ग्रस्तांच्या उपचारासाठी खासगी रूग्णालयांची सेवा ताब्यात घेणार, एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलल्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी