33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजभावनिक झालेल्या सुप्रिया सुळेंच्या तोंडून शब्दही फुटेना, अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

भावनिक झालेल्या सुप्रिया सुळेंच्या तोंडून शब्दही फुटेना, अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शरद पवार यांच्या पाठित खंजीर खुपसून अजित पवार यांनी देशात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. त्यावर सुप्रिया सुळे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. परंतु भावनिक झालेल्या सुप्रिया सुळेंच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. अतिशय केविलवाण्या चेहऱ्याने त्या फक्त पत्रकारांकडे पाहात होत्या. दुसऱ्या बाजूला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार मुर्दाबाद, शरद पवार आप आगे बडो अशी घोषणाबाजी कार्यकर्ते करीत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आता तिन्ही नेत्यांची बैठक होत आहे. या परिसरात राजकीय कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळीच कुटुंबात आणि पक्षात फूट पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली ही भावना सुप्रिया सुळे यांनी वॉट्स अप स्टेटसवर व्यक्त केली आहे. ‘पार्टी एण्ड फॅमिली स्प्लीट’ असे इंग्रजीत लिहून सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी ‘कुणावर विश्वास ठेवावा. आजपर्यंत त्यांच्यावर प्रेम केले होते. त्यांच्यामागे ठामपणे उभी राहिली होती. पण माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी फसवणूक’ असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

भावनिक झालेल्या सुप्रिया सुळेंच्या तोंडून शब्दही फुटेना, अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत, आणि अजितदादा यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यामुळे सुप्रियाताईंची ही भावना राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण मानली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी ही भावना व्यक्त केल्यामुळे अजितदादांच्या बंडावर शिक्कामोर्तब झाले आहे. एवढेच नव्हे तर, पवार कुटुंबातही फूट पडल्याचे आता उघड झाले आहे.

दरम्यान, पत्रकारांसमोर आल्यानंतर सुप्रिया यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचे स्पष्टपणे दिसले. परंतु पवार साहेब, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेतेच याबाबतची भूमिका स्पष्ट करतील. त्यानंतरच मी बोलेन असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार यांच्याविषयी मात्र काहीही बोलण्याचे त्यांनी टाळले.

रोहित पवार हे सुद्धा म्हणाले की, आम्हाला यातील काहीच माहित नाही. पवार साहेब व इतर नेतेच याबाबत बोलतील असे रोहित पवार म्हणाले.

धनंजय मुंडेही फुटले ?

धनंजय मुंडे यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर धनंजय मुंडेही फुटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तीन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. धनंजय मुंडे यांनीच अजितदादा व फडणवीस यांच्यात मनोमिलन घडवून आणल्याचे बोलले जात आहे.

सुनील तटकरे यांची भूमिका गुलदस्त्यात

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जमा झाले आहेत. पण धनंजय मुंडे यांच्या बरोबरच सुनील तटकरे सुद्धा गायब आहेत. ते अद्याप माध्यमांसमोर आलेले दिसत नाही. त्यामुळे तटकरे यांच्याभोवती संशयाचे धुके पसरले आहेत.

हे सुद्धा वाचा

काकाने पावसात कमविले, पुतण्याने रातोरात गमावले : सोशल मीडियावर फटकेबाजी

राज्यपाल जयंत पाटलांशी बोलले होते का? दिग्विजय सिंहांचा सवाल

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब

धक्कादायक बातमी : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : भाजप, राष्ट्रवादी एकत्र

राजभवनात रात्री पाप चालतात : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी