33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईपुरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

पुरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

 

टीम लय भारी
मुंबई : संपुर्ण महाराष्ट्रातून पुरग्रस्तांसाठी मदत जाहीर होत असताना आता मुंबई विद्यापीठ सुद्धा मागे राहिलेले नाही. (University to help chiplun people)

पुरग्रस्त भगत येणाऱ्या विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयाची काय स्तिथी झाली आहे हे पाहण्यासाठी गेले असता तेथील गरजूंना मोफत अन्न वाटप करण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.

मी आणि मुख्यमंत्री मित्र आहोत! देवेंद्र फडणवीसांचं प्रांजळ उत्तर

कुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे कुत्सित ट्विट

अन्नाचे वाटप करण्यासाठी महाड येथील हिरवळ विद्यालयाची मदत घेतली जात आहे. या महा विद्यालयातून कम्युनिटी किचन नावाने मदतकार्य सुरू केले जाणार आहे. या केंद्रामार्फत दररोज 300 लोकांना पुरेल इतकं दोन वेळचं जेवण मोफत देण्यात येणार आहे.

University
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास कक्षाने या योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी चिपळूण येथील बेघर झाल्याने 200 कुटुंबाना धान्य वाटप विद्यापीठ करत होते.

येथील महाविद्यालयात प्रयोगशाळा किंवा अनेक शिक्षणोपयोगी साधनांचे सुद्धा नुकसान झाले आहे. त्या संदर्भात सुद्धा महाविद्यालयांना मदत केली जाणार आहे.

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टींना इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून 3 लाखांचा दंड

mumbai University TYBA Semester 6 Result 2021 declared on mu.ac.in

यापुढेही विद्यापीठाकडून मदतीचा आणि समाजसेवेचा वसा चालूच राहील असे विद्यपीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. यासाठी त्यांनी मदतीचे आवाहन सुद्धा केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी