33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeव्हिडीओपोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

लैंगिक छळाच्या कित्येक घटना रोज समोर येताहेत. तर ही घटना आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील. एका १७ वर्षीय तरूणीला जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडून गरोदर करण्यात आले आणि त्यातून जन्मलेल्या बालकांना विकल्याची ही घटना आहे.

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. (In Palghar, sexual harassment of a girl by birth parents)  लैंगिक छळाच्या कित्येक घटना रोज समोर येताहेत. तर ही घटना आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील. एका १७ वर्षीय तरूणीला जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडून गरोदर करण्यात आले आणि त्यातून जन्मलेल्या बालकांना विकल्याची ही घटना आहे. अणि यातील धक्कादायक बाब अशी की या मुलीशी हे कृत्य करणारे कोणी दूरचे किंवा अनोळखी नसून तिचेच आईवडिल या घटनेतील मुख्य आरोपी आहेत. ही घटना नेमकी काय आहे, जरा तपशीलात पाहूया…..

एका १७ वर्षीय तरूणीने दुस-या धर्मातील २३ वर्षीय तरूणाशी मैत्री करून त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले. जेव्हा तिच्या आई-वडिलांना ती गरोदर असल्याचं कळलं, तेव्हापासून तिच्या आयुष्यात अडचणी वाढल्या. शाळेचे मुख्याध्यापक, २ महिला डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, एक वकिल अशा उच्च स्थरावर कार्यरत असलेल्या लोकांसोबत मिळून त्या मुलीच्या बाळाला विकण्याचा कट रचला गेला. तिच्या पालकांसह या कारस्थानात भागीदार असणा-यांनी तिला पुन्हा गरोदर राहण्यास भाग पाडून तिच्या नवजात मुलाला विकलं.

२०२१ मध्ये त्या मुलीचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध असल्याची तिच्या पालकांना समजले. तिच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन नियमित तपासणी आणि प्रसुतीसाठी तिला खाजगी रूग्णालयात दाखल केले गेले. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गरोदरपणात तिचे आई-वडिल मुंबईत एका ठिकाणी तिला घेउन गेले. जिथे वकिलाने तिला काही कागदपत्रांवर सही करायला सांगितले होते. २४सप्टेंबर२०२१ ला तिने एका मुलीला जन्म दिला. जन्माच्या दुस-याच दिवशी तिला सामाजिक कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात आले. या सर्व कटकारस्थानाची जाणिव होताच मुलीने पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली कि २ वेगवेगळ्या पूरूषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडून तिला सलग दोनदा गरोदर राहण्यास भाग पाडलं गेलं आणि तिच्या नवजात बालकांना विकण्यात आलं. अशा केसेस मध्ये पॉस्को कायदा हा मुख्य भूमिका बजावतो. तर काय आहे हा पॉस्को कायदा जाणून घेऊयात. ..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी