32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयशरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपासून शिवसेनेला दूर का ठेवले? संजय राऊत...

शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपासून शिवसेनेला दूर का ठेवले? संजय राऊत काय म्हणाले जाणून घ्या

टीम लय भारी

मुंबई :-  शरद पवार यांनी दिल्लीत कॉंग्रेस आणि इतर पक्षांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत टीएमसी, आप, आरजेडीचे नेते उपस्थित असतील. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार चालवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना हे निमंत्रण पाठविलेले नाही. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले. पण संजय राऊत यांनी उघडपणे काहीच सांगितले नाही (Why did Sharad Pawar keep Shiv Sena away from the Opposition meeting?).

परंतु इतर अनेक पक्षांना सामील होऊ नका असे सांगितले. संजय राऊत म्हणाले. शरद पवार आज राष्ट्र मंचच्या नेत्यांची भेट घेत आहेत. ते मोठे नेते आहेत. बरेच लोक त्यांना राजकारण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक विषयांवर सल्ला देत असतात.

आदित्य ठाकरेंनी देखण्या गावाचे केले कौतुक

मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना

संजय राऊत म्हणाले की, हा विरोधी पक्षनेत्यांचा मेळावा मला वाटत नाही. यात शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा आणि चंद्रबाबू नायडू यांचादेखील समावेश नाही. मला वाटते की विरोधकांना एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांची बैठक असल्याचे मी म्हणणार नाही. यात सपा, बसपा, वायएसआर कॉंग्रेस, टीडीपी आणि टीआरएसचा समावेश नाही (Why did Sharad Pawar keep Shiv Sena away from the Opposition meeting?).

Why did Sharad Pawar keep Shiv Sena away from the Opposition meeting?
शरद पवार आणि संजय राऊत

शरद पवार आज संध्याकाळी टीएमसी, आम आदमी पार्टी, आरजेडी यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतील. या बैठकीचा अजेंडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. पण असा अंदाज वर्तविला जात आहे. शरद पवार यांनी ही बैठक 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या राजकीय संभाव्यतेचा शोध घेण्यासाठी बोलविली आहे.

IAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

“Wasn’t Political,” Says NCP After 8 Parties Meet At Sharad Pawar’s House

या सभेसाठी लोकांना आमंत्रण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बॅनरवरून देण्यात आलेले नाही.  तर राष्ट्र मंचने दिले आहे. या मंच ची स्थापना 2018 मध्ये करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आता टीएमसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी केली आहे (Why did Sharad Pawar keep Shiv Sena away from the Opposition meeting?).

जेडीयूचे माजी नेते पवन वर्मा म्हणाले. आम्ही भाजपाला वगळता विविध राजकीय पक्ष आणि प्रदेशातील लोकांना आमंत्रित केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी