32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमंत्रालयातील कामांसाठी आमदार पत्नीच्या सोबतीने करतात पाठपुरावा

मंत्रालयातील कामांसाठी आमदार पत्नीच्या सोबतीने करतात पाठपुरावा

टीम लय भारी

मुंबई : मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी बरेच आमदार मंत्रालयात सतत चकरा मारतात. पण एक आमदार असे आहेत की, ते आपल्या पत्नीला घेऊनच मंत्रालयात कामांचा पाठपुरावा करत असतात. त्याहूनही विशेष म्हणजे, आमदार महोदयांपेक्षा त्यांच्या पत्नीचाच कामांविषयी जास्त अभ्यास आहे. त्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी या पत्नी अभ्यासू पद्धतीने चर्चा करतात, आणि विकासकामे खेचून नेतात, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती अध्यक्ष अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत आहे. पण अनेक ठिकाणी महिला नावापुरत्याच असतात, आणि प्रत्यक्षात त्यांचे पती काम करतात. पण या प्रकरणात आमदारांसह त्यांच्या पत्नीही हुशार व अग्रेसर असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.

आमदार टेकचंद व निशा सावरकर असे या पती पत्नीचे नाव आहे. टेकचंद सावरकर हे नागपूरमधील कामठी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. भाजपचे मातब्बर नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांनी टेकचंद सावरकर यांना विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघाचे तिकिट दिले होते. त्यामुळे सावरकर यांचा पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश झाला.

सावरकर यांच्या पत्नी निशा सावरकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. निशा सावरकर गेल्या जवळपास १० वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर मतदारसंघातील विकासकामे धडाक्यात झाली पाहिजेत याची जाणीव सावरकर दांपत्याला आहे. त्यामुळेच हे दांपत्य नियमितपणे मंत्रालयात येत असतात.

मंत्रालयात येऊन केवळ मंत्री किंवा वेगवेगळ्या खात्याच्या सचिवांना भेटण्यातच हे दांपत्य समाधान मानत नाही. अगदी कक्ष अधिकारी, अवर सचिव, उपसचिव, विविध मंत्र्यांचे पीए, ओएसडी यांच्याही भेटी घेत असतात. कामाच्या फाईलचा ते चिकाटीने पाठपुरावा करतात, अशा शब्दांत या दांपत्याचे कौतुक काही अधिकाऱ्यांनी ‘लय भारी’शी बोलताना केले.

हे सुद्धा वाचा

जनतेच्या कामांसाठी उपाशीपोटी मंत्रालयात धावपळ करणाऱ्या आमदारांची आरोग्य मंत्र्यांच्या दालनाच तब्येत बिघडली

मंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की शान आणि दराराही जातो

भाजपला चीतपट करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ची आणखी एका निवडणुकीत एकजूठ

VIDEO : शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी जेवण केलेल्या ‘त्या’ झोपडीचे भाग्य उजळले 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी