28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी जेवण केलेल्या ‘त्या’ झोपडीचे भाग्य उजळले

VIDEO : शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी जेवण केलेल्या ‘त्या’ झोपडीचे भाग्य उजळले

टीम लय भारी

पालघर : कुडाच्या साध्या झोपडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात भोजन केले होते. गरीब आदिवासींच्या घरात पवारांसारख्या दिग्गज मान्यवराने भोजन केल्याने त्यांचे जोरदार कौतुक झाले होते. पवार व आव्हाड यांचे या झोपडीला पाय लागल्यानंतर ‘त्या’ झोपडीचे आता भाग्य उजळले आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या आदिवासी कुटुंबाला त्याच ठिकाणी घर बांधून द्यायचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर, तिथे बांधकामास सुरूवात सुद्धा केली आहे. महिनाभरात तिथे आता देखणं घर उभे राहिल असे सूत्रांनी सांगितले.

VIDEO : शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी जेवण केलेल्या ‘त्या’ झोपडीचे भाग्य उजळले

निलेश सांबरे, हरेश पष्टे व बबन हरणे या तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून या घराचे बांधकाम हाती घेतले आहे. सिमेंट काँक्रीटमध्ये हे बांधकाम करण्यात येणार आहे. रामचंद्र व कमळ खोडके या आदिवासी दांपत्याचे हे घर आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. थोरला मुलगा दहावीत, तर धाकटी मुलगी सातवीमध्ये शिकत आहे. या गरीब कुटुंबियांना आपल्याला चांगले घर मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण पंधरवड्यांपूर्वी शरद पवार व जितेंद्र आव्हाड यांचे या घराला पाय लागले. त्यांनी या घरी भोजन घेतले. त्याच वेळी या घराचे बांधकाम करून देतो असा शब्द निलेश सांबरे यांनी पवारांना दिला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घराच्या बांधकामाला सुरूवात झाली.

VIDEO : शरद पवार, जितेंद्र आव्हाडांनी जेवण केलेल्या ‘त्या’ झोपडीचे भाग्य उजळले
हीच ‘ती’ झोपडी, ज्या ठिकाणी शरद पवार व जितेंद्र आव्हाड यांनी जेवण केले होते

पवार व आव्हाड हे शाहू, फुले व आंबेडकरांचा विचार नुसताच सांगत नाहीत, तर तो अंमलातही आणतात हे या छोट्या घटनेतून दिसून आले आहे. सध्या धर्माच्या नावावर वातावरण कलुषित झाले आहे. ‘मुहँ मे राम बगलमे छुरी’ अशा धाटणीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवार वारंवार सामाजिक सलोख्याचा संदेश देत असतात. रामचंद्र व कमळ खोडके या दांपत्याच्या बाबतीतही पवारांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिल्याच्या भावना आता व्यक्त करण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा

मी कुठेच म्हणालो नाही मला ‘जाणता राजा’ म्हणा : शरद पवार

…अन् शरद पवारांना पोलिसांनी पाठीवर वळ उठेपर्यंत मारले

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी