29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयअण्णा हजारे, सुजय विखे, निलेश लंके, विजय औटी आज भिडणार कुस्तीच्या फडात

अण्णा हजारे, सुजय विखे, निलेश लंके, विजय औटी आज भिडणार कुस्तीच्या फडात

संजय बारहाते : टीम लय भारी

नगर :  भिन्न विचारसणी, भिन्न राजकीय – सामाजिक भूमिका असलेले चार मान्यवर आज एकाच ठिकाणी येणार आहेत. त्यांची गाठ पडणार आहे, कुस्तीच्या फडात. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी हे चार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी या चौघांच्या भाषणांत शब्दांचीही कुस्ती पाहायला मिळेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ज्येष्ठ समाजजेवक अण्णा हजारे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी (शिवसेना), खासदार डॉ. सुजयदादा विखे – पाटील (भाजप), आमदार निलेश लंके (राष्ट्रवादी) हे चार दिग्गज कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभासाठी एकत्र येणार आहेत. पारनेर तालुक्यातील निघोज येथे गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस कुस्ती स्पर्धा होणार आहे.

या कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातून नामांकित पैलवान मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. विजेत्या पैलवानांना मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे. शिवाय लाखो रूपयांच्या बक्षीसांचीही खैरात होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून या कुस्तीस्पर्धेची तयारी सुरु आहे. ही स्पर्धा रंगतदार व्हावी यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठय़ा प्रमाणात स्पर्धेसाठी आर्थिक निधी दिला आहे. पारनेर तालुका हे कुस्तीचे माहेरघर आहे. यात्रा व जत्रा उत्सवात कुस्त्यांचा फड भरवला जातो. या माध्यमातून तालुक्यात मोठय़ा संख्येने कुस्तीगीर तयार झाले आहेत. पारनेर, निघोज, भाळवणी, शिरापूर या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात यात्रा, जत्रांच्या माध्यमातून कुस्त्यांचा सांगता होत असते.

ग्रामीण भागातील कुस्तीगीरांना उर्जा मिळावी यासाठी निघोज येथील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एक एकर जागेमध्ये मंडप, कुस्ती मैदान व दहा हजार कुस्ती शौकीनांना कुस्ती स्पर्धा पहाता येईल अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कुस्ती स्पर्धेचे संयोजक पैलवान हनुमंत भोसले, अर्जुनदादा लामखडे,  अमोल लंके, सुभाष वराळ, जयदीप सालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी बरेच कष्ट उपसले आहे. कुस्ती शौकिनांनी या कुस्ती स्पर्धेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन पैलवान प्रतिष्ठान पारनेर आयोजीत महाबली कुस्ती स्पर्धेच्या संयोजकांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रालयातील कामांसाठी आमदार पत्नीच्या सोबतीने करतात पाठपुरावा

अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी