33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजमंत्रालयात शुकशुकाट

मंत्रालयात शुकशुकाट

टीम लय भारी

मुंबई : ‘करोना’चा (CoronaVirus) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने मंत्रालयात सामान्य लोकांना प्रवेश बंदी केली आहे. त्याचा मोठा परिणाम आज दिसला. मोजके मंत्री, अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त आज मंत्रालयात कुणीही आलेले नव्हते. त्यामुळे मंत्रालयात पुरता शुकशुकाट दिसत होता. सुटीच्या दिवसाप्रमाणे वातावरण दिसत होते.

मंत्रालयात शुकशुकाट

मंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर आयोजित करण्यात आली होती. तत्पुर्वी काही मंत्री मंत्रालयात येऊन गेले. पण नेहमीप्रमाणे त्यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांचा लवाजमा नव्हता. मंत्री कार्यालयातील अनेक अधिकारीही आज आले नव्हते. मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी सुद्धा मंत्र्यांनी केवळ एकाच अधिकाऱ्याला सोबत आणावे अशा सुचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्या होत्या.

मंत्रालयात शुकशुकाट

मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश बंदी नव्हती. तरीही अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटी घेतली होती. परिणामी मंत्री, सचिव व इतर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गर्दी नव्हती. मोजकेच कर्मचारी या कार्यालयांमध्ये उपस्थित होते. मंत्रालयाच्या आवारात एकादा दुसराच कर्मचारी दिसत होता. त्यामुळे एरवी भरगच्च असले मंत्रालय आज कमालीची शांतता अनुभवताना दिसत होते. साफसफाई करणारे कर्मचारी मात्र ठिकठिकाणी स्वच्छता करताना दिसत होते. उद्यापासून तर मंत्रालय पुरतेच रिकामे झालेले असेल असेही या सूत्रांनी सांगितले.

हे सुद्ध वाचा

पंकजा मुंडेंचा सल्ला, मुंबई बंद केल्यास फायदा होईल

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

Breaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश टोपे

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी