28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्र'या' कारणामुळे MBBS च्या परीक्षा पुढे ढकलल्या

‘या’ कारणामुळे MBBS च्या परीक्षा पुढे ढकलल्या

टीम लय भारी

मुंबई :-  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या या वाढता प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून जाहीर करण्यात आला आहे. २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आता पुढे ढकलून त्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास ४५ ते ५० हजार विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर आज, १५ मार्चला जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा विलंबाने जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जानेवारी ते मार्च दरम्यान सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये जाहीर करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ४ जानेवारीला सुरू होऊन पूर्ण झाल्या. त्यानंतर ८ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, सध्या त्या परीक्षा सुरू आहेत. परंतु राज्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत होती.

याची दखल घेत, राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लावलेले निर्बंध, कॉलेजांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षांचे उन्हाळी २०२० परीक्षांची काही विद्याशाखांची निकाल प्रक्रिया सुरू असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या परीक्षा १९ एप्रिलपासून घेण्यात येणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी