30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमाण - खटावमध्ये वातावरण तापले, प्रभाकर देशमुखांच्या कार्यकर्त्यांमागे गावगुंडाचा ससेमिरा

माण – खटावमध्ये वातावरण तापले, प्रभाकर देशमुखांच्या कार्यकर्त्यांमागे गावगुंडाचा ससेमिरा

लय भारी न्यूज नेटवर्क

दहिवडी : विधानसभा निवडणुकीला अवघे तीन – चार दिवस उरले आहेत. प्रचाराची मुदत संपण्यास तर एकच दिवस उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर माण – खटाव मतदारसंघातील वातावरण तापले आहे. विशेषत: गावावरून ओवाळून टाकलेले गुंड सक्रिय झाले आहेत. या गुंडांचा सर्वाधिक उपद्रव प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना होत आहे.

प्रभाकर देशमुख यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पायखालची वाळू सरकली आहे. सज्जन, हुशार, बुद्धिमान व सुसंस्कृत देशमुखांबद्दल सामान्य जनतेमध्ये कमालीचे आकर्षण निर्माण झाले आहे. अशातच देशमुख यांचे कार्यकर्ते गावागावांत मतदारांजवळ पोचत आहेत. पण देशमुखांच्या या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गावगुंडांनी दबावतंत्राचा वापर करायला सुरूवात केली आहे. हे उडाणटप्पू कार्यकर्ते देशमुखांच्या कार्यकर्त्यांना ‘तुम्ही प्रचार करू नका’, प्रचारात येऊ नका, तुम्हाला त्रास होईल अशा विनंतीवजा धमक्या देत आहेत.

कळस म्हणजे, देशमुख यांच्या कार्यकर्त्यांच्या मागे विरोधकांचे कार्यकर्ते पाळत ठेवत आहेत. जिथे देशमुख यांचे कार्यकर्ते जातील तिथे विरोधकांचे कार्यकर्ते पाठलाग करीत आहेत. देशमुखांचा प्रचार कोण कोण करत आहे याच्या नोंदी हे गावगुंड घेत आहेत.

माण – खटावमधील मतदारसंघात लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात दहशत निर्माण केली आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी गावातील गुंड, दारूडे यांना आपले कार्यकर्ते बनविले आहे. हे कार्यकर्ते निवडणुक काळात मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात. परंतु यावेळी मात्र अशा गावगुंड कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. प्रभाकर देशमुख यांच्याकडे उच्च शिक्षीत, स्वाभिमानी, स्वच्छ चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे सामान्य मतदार देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल कमालीचे सकारात्मक आहेत. त्यामुळे विरोधी गावगुंड कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.

दहशतीला घाबरू नका : प्रभाकर देशमुख

घराघरांत भांडणे लावणे, कार्यकर्त्यांचे आयुष्य उध्वस्त करणे अशी संस्कृती गेल्या दहा वर्षांत माण – खटावमध्ये फोफावली आहे. माण – खटावमधील ही संस्कृती संपवून तिथे लोकशाहीची मूल्ये स्थापित करण्यासाठी आपली लढाई आहे. त्यामुळे अशा गावगुंडांना घाबरू नका. माण – खटावमध्ये आता कायद्याची ताकद वाढली आहे. हा कायदा गावगुंडांना सरळ करेल. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकहिताचा, विकासाचा व प्रगतीचा कार्यक्रम घेऊन मतदारांपर्यंत पोचावे असे आवाहन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी