28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल

राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटची शिफारस केली आहे. हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल, असं म्हणत सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजपने सत्तास्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेला 24 तासात सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल करण्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने मुदत वाढवून मागितल्यानंतर त्यांना नकार देण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी मंगळवार रात्री 8. 30 वाजेपर्यंतची मुदत दिली. मात्र त्या आधीच राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी हालचाली केल्या आणि राष्ट्रपती पत्र पाठविले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु त्यांची मुदत संपण्याआधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्या आधी राज्यापालांनी गरबड केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यपाल हे भाजपा चे बाहुले आहेत का? असा सवाल करत भाजपावर हल्लाबोल केला.

सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटी शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल, असं म्हणत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली आहे. यामुळे काँग्रेससह, राष्ट्रवादी, शिवसेनेत संताप पसरला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा राष्ट्रपती कार्यालयाकडे लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी