31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हत : अमित शाह

शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हत : अमित शाह

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : महाराष्ट्रातल्या निकालानंतर शिवसेना भाजपच्या वादावादी नंतर भाजप अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा भाष्य केलं. निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली. त्यांचा हट्ट आम्ही पुरवू शकत नाही. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असं काहीही ठरलेलं नव्हतं असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावं. राज्यपालांनी नियमानुसारच राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस केली होती. असंही अमित शाह यांनी सांगितलं. विशेष म्हणजे अमित शाहांनी निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादानंतर चकार शब्दही काढला नव्हता. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार विरुध्द टीकेची झोड उडाली आहे. त्यानंतर आता शाह यांनी यावर भाष्य केलं.

ज्यांच्याकडे बहुमत आहे ते आताही राज्यपालांकडे जाऊ शकतात आणि सत्तास्थापन करु शकता. त्यांनी कोण रोखले असा सवाल उपस्थितीत केला. अठरा दिवसांचा अवधी होता त्यावेळी कोणताही पक्ष बहुमत सिध्द करु शकलं नाही. त्यानंतरच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटी बाबत निर्णय घेतला. असंही शाह म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी