31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारावा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारावा ; रिपब्लिकन पक्ष खोरिपा ची मागणी

टीम लय भारी

 मुंबई : वीस वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हि टी) ह्या मध्य रेल्वेच्या अतिशय महत्त्वाचे हेरिटेज दर्जा असलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बोरिबंदर मुंबई येथील  दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा बसविणे आवश्यक होते. मात्र, अद्यापपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.

मुंबईमध्ये दररोज लाखो लोक येत असतात. त्यात परदेशी पर्यटकसुद्धा असतात, शिवाय देशाच्या विविध राज्यांतील लोक नोकरी, व्यवसाय करण्यासाठी मुंबईमध्ये येतात.  तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता मुंबई मध्ये कामानिमित्त येत असतात. ह्या सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा दिसला पाहिजे. दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशा मागणीचे पत्र रिपब्लिकन पक्ष खोरिपा मुंबई प्रदेशच्या वतीने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांना मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी