31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा...

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

टीम लय भारी

 मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. आम्ही आदमी पक्षातर्फे ही तक्रार कारण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी त्यांच्या भाषणात ‘नाखाऊंगा, ना खाने दुंगा’ असे सांगतात. भ्रष्टाचार मुक्त भारत हे त्यांचे स्वप्न आहे असेही सांगतात. हे स्वप्न खरे करण्यासाठी आता भाजपमधील बोगस श्रीमंत मजुराची तात्काळ हकालपट्टी करा अशी आमची भाजप नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी आहे.

 देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रवीण दरेकर हा बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास रुपये२००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून कामकेल्याचे सहकार विभागाच्याचौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट होईल, असे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणाताही ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ न देता आम्ही थेट अहवालच देण्यास तयार आहोत. दरेकर यांना भाजपने आतातरी नारळ द्यावा अशी भूमिका आम आदमी पक्षाची आहे.

प्रवीण दरेकर यांची ज्या ‘प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे’त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे ‘रंगारी’ मजूर असल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा बराच रंग (चुना) त्यानी गेले अनेक वर्ष मुंबई बँकेला लावला आहे. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली व किती मजुरी यासाठी त्याना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा अशी आम आदमी पार्टीची मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी