30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनहनुमानाच्या तोंडी अशी भाषा?? आदिपुरुष चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देशाची माफी मागावी; प्रियंका चतुर्वेदी...

हनुमानाच्या तोंडी अशी भाषा?? आदिपुरुष चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देशाची माफी मागावी; प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी

दिग्दर्शक ओम राऊत यांचा बहुचर्चित आदिपुरुष चित्रपट काल प्रदर्शित झाला. दाक्षिनात्य अभिनेता प्रभास, अभिनेत्री क्रिती सेनन, सैफ अली खान अशी स्टारकास्ट असल्या या चित्रपटातील संवाद आणि व्हिएफएक्समुळे चित्रपटावर मोठ्याप्रमाणात टीकेची झोड उठली आहे. असे असले तरी दुसऱ्याबाजूला चित्रपटाची आर्थिक कमाई देखील मोठी असून प्रेक्षकांची चित्रपटगृहात झुंबड उडाली आहे. चित्रपटातील हनुमानाच्या तोंडी असेलल्या संवादावरुन चित्रपटावर टीका होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील या चित्रपटातील संवादावर आक्षेप घेत, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी याबबत एक ट्विट केले असून त्यांनी चित्रपटातील संवादावर आक्षेप घेत चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर निशाणा साधला आहे.

आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी हनुमानाच्या पात्रासाठी लिहीलेल्या अत्यंत निरस अशा संवादाप्रकरणी देशाची माफी मागावी. केवळ मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या हुनमानाच्या तोंडी भारतीयांच्या भावना दुखावणारी भाषा घातली जात आहे. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्यावर चित्रपट बनवित आहात आणि दुसरीकडे बॉक्स आफीसवर यशस्वी होण्यासाठी मर्यादेच्या सर्व सीमारेषा ओलांडत आहात असे, प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.


आदिपुरुष शुक्रवारी देशभरात हिंदी, तेलगु, कन्नड आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात कालपासून मोठी गर्दी होत असताना दुसरीकडे चित्रपटातील संवादावरुन मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. चित्रपटामध्ये हनुमानाच्या तोंडी ”तेल तेरे बाप का… जलेगी तेरे बाप की…” असलेला संवाद अनेकांना रुचला नाही. देवांच्या तोंडी अशी भाषा असते का असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. नेपाळमधून देखील या चित्रपटाला विरोध झाला. चित्रपटात भारत की बेटी सिता असा संवाद आहे, यावर नेपाळमधून आक्षेप घेण्यात आला आहे. सितेचा जन्म नेपाळमध्ये जनकपूरमध्ये झाल्याची नेपाळवासियांची धारणा आहे, त्यामुळे या संवादावर नेपाळमध्ये देखील चित्रपटाला विरोध होत आहे.

हे सुद्धा वाचा

संत निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंद्यात दाखल; संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा पडणार पार

हवामानातील बदलामुळे पाऊस लांबणीवर 23 जूननंतर पावसाची शक्यता; शेतकरी राजा चिंतेत

सावित्रीबाई फुले वसतिगृहातील बलात्कार प्रकरण; नऊ दिवसांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन

दुसरीकडे चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी चित्रपटातील संवादांचे समर्थन केले आहे. रामायणातील संवाद अशा पद्धतीने मांडणारा मी काही पहिलाच व्यक्ती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटात अनेक पात्रे असतात आणि ती सर्व एकाच पद्धतीने बोलत नाहीत. असे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी