30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटWTC नंतर आता टीम इंडियाची नजर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकवर

WTC नंतर आता टीम इंडियाची नजर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकवर

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जिंकून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा होती. मात्र यात टीम इंडियाच्या हाती निराशाच आली. दरम्यान अजून एक मोठी स्पर्धा बाकी आहे. जेणेकरून भारत हा दुष्काळ संपवू शकेल. देशाला या स्पर्धेकडून खूप आशा आहेत. ही स्पर्धा म्हणजे आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आहे. हा विश्वचषक भारतात फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळवला जाईल. टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत या विश्वचषकावर नाव कोरायला आवडेल आणि आता त्याच्या तयारीसाठी फक्त 12 सामने शिल्लक आहेत.

विश्वचषकापूर्वी भारताला जवळपास 12 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्येच त्याला विश्वविजेता बनण्याची तयारी करावी लागेल. भारताला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात भारताला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर भारताला 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान आशिया कप खेळण्यासाठी जायचे आहे. हा आशिया चषक यावेळी एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाणार आहे. भारताने या आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली तर त्याला येथे सहा सामने खेळावे लागतील.

हे सुध्दा वाचा:

दर्शना पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता , हवामान विभागाचा अंदाज

ज्या पेशव्यांनी होळकरांना त्रास दिला, त्याच पेशव्यांच्या टोप्या कशाला; छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

भारताने शेवटची 2013 मध्ये ICC ट्रॉफी जिंकली होती. भारताने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये स्वतःच्या घरी जिंकला होता आणि आता पुन्हा एकदा त्याला घरच्या मैदानावर संधी मिळत आहे. ऋषभ पंतलाही दुखापत झाली असून तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. भारत केएल राहुलला एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळवत होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी