30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रबकरी ईदला कुर्बानी न देण्याचा संभाजीनगरमधील मुस्लिमांचा क्रांतिकारी निर्णय

बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा संभाजीनगरमधील मुस्लिमांचा क्रांतिकारी निर्णय

राज्यात गेल्या काही महिन्यात क्षुल्लक कारणामुळे हिंदू- मुस्लिम दंगली झालेल्या आहेत. त्यामुळे विद्वेषाचे वातावरण दोन्ही समाजात वाढत असल्याचे चित्र दिसत असताना संभाजी नगरमधील मुस्लिमांनी आषाढीच्या दिवशी येणाऱ्या ईदीला कुर्बानी न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.

आषाढी एकादशी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. वारीसाठी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. विठुरायाच्या नामात मंत्रमुंग्ध होऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. अख्ख्या महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत डुंबला आहे. आषाढी एकादशीला कधी पंढरपूरला पोहचतो असे वारकऱ्यांना वाटायला लागले आहे. यंदा २९ जून रोजी आषाढी एकादशी येत असून त्याचदिवशी बकरी ईद हा मुस्लिमांचा सणही येत आहे. सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत असा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील पंढरपूर येथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक बोलावली होती. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचं देखील या बैठकीत निर्णय झाला.

हे सुध्दा वाचा:

माणच्या उत्तरेकडील 32 गावांची भाजपाकडून दिशाभूल; प्रशांत विरकर यांचा आरोप

उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबईतील 40 वर्षे जुन्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

दर्शना पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

एकादशीच्या दिवशी आपण ‎उपवास करीत सर्वांना सुखी ठेव ही‎ प्रार्थना करतो. त्यामुळे हिंदूंना त्रास होऊ नये मुस्लिमांनी दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहेत. हा निर्णय चांगला असल्याने मुस्लीम बांधवाचे कौतुक केले जात आहे. राज्यातील सगळ्याच जिल्ह्यातील पोलिसांनी अशी सामिलकीची भूमिका घेतल्यास राज्यात दोन धर्मात दंगली घडणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी