30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयराज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर

राज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर

मुंबई महापालिका कोविड घोटाळ्यासंबंधी तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तसेच खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यावर खासदार संजय राऊत चवताळून उठले आहेत.राज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर असून राज्य सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादीच त्यांनी जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.

उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (२१ जून) याप्रकरणी ठाकरे गटाशी संबंधित १५ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. त्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे असून मी ते ईडीला दिले आहेत. काल नाकाने कांदे सोलणारे फडणवीस या नेत्यांवर कारवाई करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश सहकारी कारख्यान्यात पराभव का झाला? भ्रष्टाचारामुळेच त्यांचा पराभव झाला. तुमच्या भाजपाच्या लोकांनीच त्यांचा पराभव केला आहे. राधाकृष्ण विखेपाटील यांच्या संस्थानात झाकीर नाईक ४.५ कोटी रुपये का देतो. फडणवीसांची हिंमत आहे का याबद्दल चौकशी करण्याची. अन्यथा गृहमंत्र्यालयाने ईडीला पत्र लिहावं. राधाकृष्ण विखेपाटील यांच्या खात्यात झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का पाठवतो. याच झाकीर नाईकवर केंद्र सरकारने टेरर फंडिंगचा आरोप केला आहे. ते साडेचार कोटी झाकीर नाईकने का पाठवले, ते पैसे कसे आले, त्या पैशाचे काय व्यवहार झाले होते. त्यासंबंधी काय हालचाली होत्या.

गृहमंत्री असूनही फडणवीसांकडे याबद्दलची माहिती नसेल तर ती आम्ही देतो. आमदार राहुल कुल यांच्या ५०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. यासंदर्भात काल आणि परवा ईडीकडे माहिती पोहोचली आहे. राहुल कुल हे भाजपाचे दौंडचे आमदार आहे. फडणवीसांचे एकदमक खास. यावर काय करतायत फडणवीस. असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा संभाजीनगरमधील मुस्लिमांचा क्रांतिकारी निर्णय

माणच्या उत्तरेकडील 32 गावांची भाजपाकडून दिशाभूल; प्रशांत विरकर यांचा आरोप

उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबईतील 40 वर्षे जुन्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

संजय राऊत म्हणाले, दादा भुसे यांच्या १२८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची माहिती मिळाली आहे. याचे पुरावे ईडीकडे पोहोचले आहेत. उद्या अब्दुल सत्तारांच्या ७५० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे कागद ईडीकडे जातील. राऊत यांनी राज्याचे तीन मंत्री तसेच भाजपचा एक आमदार यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी