30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंत निवृत्तीनाथांच्या पालखीने केला 339 किमीचा प्रवास; संत तुकाराम महाराजांची पालखी आज...

संत निवृत्तीनाथांच्या पालखीने केला 339 किमीचा प्रवास; संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी मुक्कामाला

टाळ वाजे मृदंग वाजे
वाजे हरिचा वीणा
माऊली-तुकोबा निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…..
हरीनामच्या गजरात पालख्यांचे मार्गक्रमण पंढरपूर कडे होत आहे. अगदी थोड्याच दिवसात भक्तांना विठुरायचे मुखदर्शन होणार आहे. गोल रिंगण, उभे रिंगण, अश्व रिंगण सोहळे पार पडत पालखी पंढरपूरच्या वाटेवर चालली आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीला बावीस दिवस पूर्ण झाले असून पालखीने 339 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी जवळा गावातील मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. पालखीने सोलापूरकडे मार्गक्रमण केले असून पालखीने 388 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला आहे. आज पालखीसाठी वाकडी गावाच्या ग्रामस्थांकडून वरकऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. वाकडीवरुन पुढे चालत दिंडी शेंद्रीला मुक्कामाला आहे.

भक्तिमध्ये तल्लीन झालेले वारकरी अभंग, भजन-कीर्तन करत पालखीचा पायी प्रवास करत आहेत. अशा भक्तिमय वातावरणात देहुतून निघालेल्या जग्दगुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी कालच्या अश्व रिंगण सोहळ्यानंतर आज सराटीला मुक्कामाला असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुते गावला मुक्काम करणार आहे.

हे सुध्दा वाचा:

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड बाजारात लाखोंची उलाढाल

राज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर

बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा संभाजीनगरमधील मुस्लिमांचा क्रांतिकारी निर्णय

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यादोन्ही पालख्यांचे उद्या गोल रिंगण सोहळे पार पडणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा उद्या अकलुज माने विद्यालय येथे आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा पुरंदवडे येथे गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी