30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त

मुंबई मध्ये बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये नव्याने शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच मुख्य निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निवडणूक कामासंदर्भातील पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना अनेक ठिकाणी पाठवण्यात आले आहे. यामुळे मुख्याध्यापकांच्या चिंता आता वाढली आहे.

अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आणि विद्यार्थांची संख्या जास्त आहे. अशातच सर्व शिक्षकांना निवडणूक ड्यूटी लागल्यामुळे शिक्षकही व्यस्त झाले आहेत. यामुळे यापुढे शाळा काशी चालवावी असा मोठा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने निवडणूक कार्यकारी अधिकारी यांचे पत्र सर्व शाळांतील शिक्षकांना मुख्याध्यापकां व्दारा देण्यात आलेले आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 13 ब (2) व कलम 32 यानुसार हे पत्र देण्यात आलेले आहे. यापत्रात दिलेल्या आदेशा नुसार निवडणुकीचे काम करताना शाळेचे कामकाज सांभाळून मतदार यादीचे काम सुद्धा शिक्षकांना करावे लागणार आहे. या निवडणूक कामाची टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 132 नुसार कार्यालय प्रमुख तसेच संबंधित अधिकारी हे शिक्षेसाठी प्राप्त राहतील अशी सूचनाही या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांच्याही डोक्याची चिंता वाढली आहे.

हे सुध्दा वाचा:

संत निवृत्तीनाथांच्या पालखीने केला 339 किमीचा प्रवास; संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी मुक्कामाला

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड बाजारात लाखोंची उलाढाल

राज्याचे तीन मंत्री एक आमदार संजय राऊत यांच्या रडारवर

शिक्षकांची न झालेली भरती, शाळांवर अपुरे शिक्षक आणि त्यात शाळा सुद्धा नुकत्याच सुरू झाल्यामुळे प्रथम घटक चाचणी परीक्षा सुद्धा झाल्या नाहीत. त्यामुळे निवडणुकीचे काम करून अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. निवडणूक, जनगणना आणि नैसर्गिक आपत्ती यातून शिक्षकांची सुटका होणार नाही. यामुळे शिक्षक निवडणूक कामासाठी हजर होणार पण अध्ययन – अध्यापन प्रक्रिया निवडणुकीचे काम करताना काशी पार पडणार? असा प्रश्न शिक्षक व मुख्याध्यापक विचारात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी