30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसह राज्यात पावसाने लावली हजेरी, बळीराजाला दिलासा

मुंबईसह राज्यात पावसाने लावली हजेरी, बळीराजाला दिलासा

मुंबईकर ज्यांची आतुरतेने वाट बघत होते तो शेवटी मुंबईकरांसाठी आज सकाळी हजर झाला. अखेर पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. यंदा राज्यात मान्सूनचा आगमनाला उशिर झाला. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका मान्सूनला बसला होता. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील दादर, लालबाग, परळ, शीव, कुर्ला, ठाणे,कल्याण,नवी मुंबई या परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या वातावरणामुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पावसाने हजेरी लावल्यानंतर मु्ंबईकरांनी सोशल मिडियावर पावसाचे पोस्ट टाकून पावसाचे स्वागत केले आहे.मुंबईकर कामाला जाताना पावसाचा आनंद घेत आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर वारे तीव्र गतीने वाहणार आहेत. तीव्र वाऱ्यांमुळे मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसाच पावसाचा जोर ही वाढणार आहे.

हे सुध्दा वाचा:

मुंबईत पाचशेच्या बनावट नोटा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या !

भाजपविरोधात विरोधकांची एकजूट; पाटण्यातील बैठकीत काय म्हणाले पवार-ठाकरे ?

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त

एकादशीला जोरदार पाऊस पडणार असल्याचे संकेत हे असताताच. दरवर्षी पाऊस लांबला तरी आषाढी एकादशीला पाऊस पडतोच, हे अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत. यावर्षी ही पाऊस लांबल्याने एकादशीच्या आधी पाऊस हजर झाला आहे.शेतकरी पाऊस लांबल्यामुळे चिंतेत होता मात्र वरुण राजा बरसल्यानंतर शेतीच्या कामाला वेग आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी