गेल्या काही दिवसांपासूण मुलींवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांड ताज असतानाच आत्ता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. ही तरुणी एमपीएसची विद्यार्थिनी असून एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील ही घटना असून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. दर्शना पवारच्या हत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणीवर हल्ला झाल्यामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे.
या घटनेमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या बऱ्याच दिवसांपासून पीडित तरुणीला त्रास देत होता. या विषयीची सर्व कल्पना तरुणाच्या आई-वडिलांना देण्यात आली होती. तरुणालाही समजावून सांगण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा:
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारताच्या सामन्यांची यादी
तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या चरणी, मंत्रिमंडळासह घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन
पंतप्रधानाच्या हस्ते 5 वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्धाटन
आरोपीने मुलीला फोन वरुण धमकी दिली होती. आरोपीला पीडित तरुणीच्या आईने समजावून सांगितलेले की, माझ्या मुलीला तुझ्यासोबत मैत्री करण्याची इच्छा नाही तू जर तिला त्रास दिला तर मी पोलीस तक्रार करेल. याच रागातून आरोपीने तरुणीला रस्त्यात एकट गाठून तिच्यावर कोयत्याने वार केला. ज्यावेळी आरोपीने तरुणीवर हल्ला केला त्यावेळी त्याच्या सोबत त्याचा एक मित्र सुद्धा होता. जेव्हा आरोपी तरुण तरुणीमागे कोयता घेऊन तिला मारण्यासाठी पळत होता तेव्हा लेशपाल जवळे या तरुणाने आरोपीच्या हातातील कोयता धरत तरुणीचा जीव वाचवला.