30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशासन आपल्या दारी उपक्रम कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी धमकी सत्र सुरू; राष्ट्रवादीच्या...

शासन आपल्या दारी उपक्रम कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी धमकी सत्र सुरू; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत सरकारी योजना पोहचवण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे. पण या उपक्रमाच्या कार्यक्रमासाठी दमबाजी करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे.

जळगावमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी जास्तीतजास्त गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणाचा दुरूपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे नाहीतर त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येतील. व पुढचे चार महीने रेशन मिळणार नाही अस लोकांना धमकावण्यात येत आहे. जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सरकारच्या या धमकीवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा:

पुण्यात एमपीएससी तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारताच्या सामन्यांची यादी

तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या चरणी, मंत्रिमंडळासह घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला मोफत धान्य मिळते. त्यामुळे त्यांच्या सभेला उपस्थित राहणे सर्व रेशनकार्डधारकांना बंधनकारक आहे. जे सभेला गैरहजर राहतील त्यांचे रेशनकार्ड रद्द करून त्यांना पुढील तीन चार महिन्यासाठी बंद करण्यात येईल, असा सरकारचा नियम आहे. असे संदेश जळगाव जिल्ह्यातील रेशन दुकांदाराकडून सर्व रेशनकार्डधारकांना पाठवण्यात आले आहेत. जळगाव महापालिकेच्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेच्याच वेळेत होत असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश बजावले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी