30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसाडेअकरा तासानंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरळीत,दरड कोसळल्यामुळे वाहतूक झाली होती ठप्प

साडेअकरा तासानंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरळीत,दरड कोसळल्यामुळे वाहतूक झाली होती ठप्प

पावसाळा सुरू झाला की घाटात दरड कोसळण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे वाहतूक चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळण्याची घटना घडली होती. दरड कोसळून रस्त्याचा एक भाग दरीत गेला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक ठप्प  झाली होती. सकाळी दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. दरड काढण्याचे काम सकाळी 11 च्या सुमारास पूर्ण झाल्याने वाहतूक साडेअकरा तासानंतर सुरळीत झाली आहे.

आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यात असलातरी सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी नगरिकांना तो सोईचा आहे त्यामुळे याघाट रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. दरम्यान घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही दरड तातडीने हटवण्याचे काम रात्री शक्य नसल्याने बुधवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी करून, दरड हटवण्याचे काम  तातडीने सुरु केले. मुसळधार  पावसामुळे या कामात अडचणी येत होत्या. पाण्यासोबत लहान मोठे दगड आणि मातीचे ढिगारे ओघळून खाली येत होते. जेसिबी मशीनच्या साह्याने हे ढिगारे हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. रस्ता मोकळा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली.

हे सुद्धा वाचा:

ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकांच्या पुतणीवर हल्ला शिंदे गटाचा आमदार धावला मदतीला

एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे आयोजन थेट अंतराळातून, पहा फोटो

शासन आपल्या दारी उपक्रम कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी धमकी सत्र सुरू; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप

महाबळेश्वर ते पोलादपूरमध्ये दोन घाट आहेत. ‘फिट्झेराल्ड’ आणि ‘आंबेनळी’. आंबेनळी हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या महामार्गावर आहे. 40 किलोमीटर लांब गाडीचा रस्ता असून घाटाची ऊंची 623 मीटर आहे. आंबेनळी घाट हा कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. आंबेनळी घाटाच्या जवळ घनदाट अरण्य आहे. कोकण आणि महाबळेश्वर ही दोन्ही पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे पर्यटनासाठी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. आत्ता येथे पर्यटन वाढल्यामुळे घाटात गाड्यांची वर्दळ देखील वाढली आहे. घाटातील रस्ता हा धोकादायक वळणांचा असल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसांपासून घाटात दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी