30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपावसाने राज्याला झोडपले; आजही मुसळधार पावसाची शक्यता

पावसाने राज्याला झोडपले; आजही मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात विविध भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, अंबरनाथ, कर्जत, कसारा, सगळीकडे जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये पाणी भरले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. आणि  दुकानात, घरात पाणी शिरले. एकीकडे बळीराजा सुखावला तर दुसरीकडे शहरी भागांतील नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर पावसाचा जोर 30 जून पर्यंत कायम राहणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे.

पावसामुळे नवी मुंबईमध्ये एनआरआय सोसायटीमधील संरक्षक भिंत कोसळली आहे. यामध्ये तीन कारचे नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये फक्त 2424 टन भाजीपल्याची आवक झाली असून पावसामुळे भाजीपाला खराब होत आहे. आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक भाज्यांचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मागील काही तासांपासून ठाण्यामध्ये 105 मिमी पाऊस झाला आहे. ठाण्यातील गुन्हे शाखेचे आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाणी शिरले हे पाणी पंपाद्वारे  उपसण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, मोहाने, आणि जांभूलपाडा येथे उल्हास नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. भिवंडीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या सतत धो धो पडणाऱ्या पावसामुळे ट्रेन 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.

पालघर जिल्ह्याला पावसाने मागील तीन दिवसांपासून झोडपून काढले आहे. पालघर जिल्ह्यात बुधवारी सरासरी 65. 64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. पाऊस आणि वारे यामुळे उधानाच्या लाटा बंधाऱ्याला धडका देऊ लागल्याने किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच आत्ता पर्यंत जिल्ह्यामध्ये 685.19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा:

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली

पुण्यातील तरुणीला हल्यापासून वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा पाऊस

सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी