30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमसदशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर कारवाई

सदशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर कारवाई

पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दोन तरुण मदतीला धावल्याने या तरुणीचा जीव वाचला, पण ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्या पोलिसांनी हे प्रकरण हाताळताना हलगर्जी केल्याने तीन पोलिसानंवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणातून राज्यातील पोलीस अलर्ट झाले असून शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहाद्दुर तरुणांचे फोनद्वारे कौतुक केले आहे. तरुणीला ती युवती आपला जीव वाचवण्यासाठी धावत होती. तरुणी स्वत: च्या जीव वाचवण्यासाठी एका बेकरीतही गेली होती. मात्र त्या व्यक्तीने शटर बंद केले. त्याचवेळी ती पोलीस चौकीत गेली होती पण तेव्हा चौकी बंद होती. या तरुणीचा जीव लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी तिचा जीव वाचवला. हा सगळा प्रकार सदाशिव पेठेतील स्वाद रेस्टॉरंट समोर मंगळवारी सकाळी 10 वाजता घडला.

पेरूगेट पोलीस चौकीतील हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे वेळेवर मदत मिळू शकली नाही. कामात हलगर्जी केल्यामुळे पोलिसांवर बदनामीचा ठपका बसला आहे. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ज्यावेळी जखमी तरुणीला पोलीस चौकीत घेऊन गेल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस तिथे आले नंतर कडी उघडली. आरोपी तरुणाने कोयत्याने वार केल्यामुळे त्या तरुणीला हातावर आणि डोक्यावर टाके टाकावे लागले. त्या आरोपी तरुणाचे नाव शांतनु जाधव आहे. तो पोलीस कोठडीत आहे.

हे सुध्दा वाचा:

मुसळधार पाऊस कोसळू लागल्यावरही धरणांचे घसे कोरडे; मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात

पावसाने राज्याला झोडपले; आजही मुसळधार पावसाची शक्यता

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली

पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा तरुणीला मदत मिळाली नाही. पोलीस चौकी ही नागरिकांच्या सुरक्षितेसाठी असते मात्र दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला होत असेल तर ही सगळी गोष्ट गांभीर्यस्पद आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून राहुल हंडोरे यांने राजगडाच्या पायथ्याशी केला. पुणे हे विदयेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. इथे मात्र मुलींचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी