संजू राठोडचं नवं गाणं सध्या चर्चेत आहे. नऊवारी साडी हे गाणं लोकप्रिय झालं असून लहान – मोठी माणसेही हे गाणं गुणगुणत आहेत. संजू हा बाप्पाचा भक्त आहे. देव बाप्पा या गाण्याने संजूने करिअरची सुरुवात केली. याची भक्ती बाप्पापर्यंत पोहचली आहे. बाप्पाच्या गाण्याने तो संपूर्ण भारतात पोहचला आहे. डिंपल, देव बाप्पा- बाप्पावाला गाणा , स्टाईल मारतंय, येड्यावानी करतयं, करमत नाही, झुमका, नऊवारी ही गाणी प्रेक्षकांच्या मनात बसली आहेत. इंस्टाग्रामवर चार लाखांहून अधिक लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणं ट्रे्ंड झालं आहे. संजू हा गीतकार, संगीतकार, गायक आहे.
नऊवारी साडी या गाण्याला अवघ्या काही महिन्यातच मिलिअन मिळाले आहेत. नऊवारी साडी या गाण्यासाठी संजू, प्राजक्ता घाग, गौरव राठोड, मनिष महाजन या टीमने मेहनत घेऊन 20 मिलिअनचा टप्पा पार केला आहे. तर स्पॉटिफाय या ऑडियो प्लॅटफॉर्मवर 1 मिलिअन स्ट्रीम्स मिळाले. मिलियन टप्पा पार करणं हे संजूसाठी सोप नव्हतं. संजूला संगीताचा वारसा नाही तरीही त्याने स्वता: च्या मेहनतीवर ओळख निर्माण केली आहे.
हे सुध्दा वाचा:
सदशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर कारवाई
मुसळधार पाऊस कोसळू लागल्यावरही धरणांचे घसे कोरडे; मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात
पावसाने राज्याला झोडपले; आजही मुसळधार पावसाची शक्यता
संजू राठोड हा महाराष्ट्रातील जळगाव धानवड तांडा इथला राहणारा आहे. या प्रवासात संजूला त्याच्या भावाची मोलाची साथ मिळाली आहे. संजूचा भाऊ गौरव राठोड या दोघांनी अनेक मराठी गाणी तयार केली आहेत. संजूच्या पॅशनला बिलिव्ह आर्टिस्ट सव्हिसेस या कंपनीची साथ मिळाली आहे. प्रेक्षकांसाठी संजू नवनवीन गाणी तयार करत आहे. प्रेक्षकांच्या भेटीला बुलेटवाली हे गाणं लवकरचं येणार आहे. या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांचे तेवढेच प्रेम मिळलं.