30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमधावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित

मंबईत पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीने बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. ग्रॅन्ट रोड स्टेशनवर एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला असून मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ही तरुणी मालाड येथे राहते. तिने चर्नी रोडहून चर्चगेटची लोकल पकडली होती. ग्रॅन्ट रोड स्टेशनवर येताच तिच्याशी अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता.

या तरुणीने आरडाओरडा करत असताना त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारुन पळ काढला. तरुणीच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर चालत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली आहे. महिलेचा पुन्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोणत्याही महिलेवर अतिप्रसंग झाल्यास त्या आरोपीला कठीणाताली कठीण शिक्षा देऊन किंवा त्या व्यक्तीस लगेच मृत्यूदंड दिला जावा.

हे सुध्दा वाचा:

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; रेल्वे वाहतूक उशिरा, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुसळधार पाऊस कोसळू लागल्यावरही धरणांचे घसे कोरडे; मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात

सदशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर कारवाई

मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरात महिला खरंच सुरक्षित आहे का? हे प्रकरण सरकारने गांभीर्यतणे घ्यावे. यावर लगेच निर्णय घेऊन मुलींना सुरक्षा द्यावी. अशा प्रकरणामुळे मुलींना घराबाहेर पडण्याचे भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांत  राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली  वाढ चिंताजनक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी