30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमसदाशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला चार दिवसांची पोलीस कोठडी

सदाशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला चार दिवसांची पोलीस कोठडी

पुण्यातील सदाशिव पेठेत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीवर दिवसाढवळ्या रस्त्यावर कोयत्याने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. आरोपीने जबाबात तरुणीवर हल्ला का केला ? याचं कारण सांगितलं आहे. आता त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्या आरोपीचे नाव शंतनू लक्ष्मण जाधव असून तो वय 21 वर्षांचा आहे.

प्रेमसंबंध संपवल्याचा रागातून त्या आरोपीने 27 जूनला सकाळी दहाच्या सुमारास पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीचा पाठलाग करुन तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपी शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्यामध्ये मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. या तरुणीचा जीव लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी तिचा जीव वाचवला. त्यामुळे ही तरुणी थोडक्यासाठी बचावली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावा, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुध्दा वाचा:

मनीषा कायंदे गेल्या, आता राहुल कनाल शिंदे गटाच्या वाटेवर…..

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; रेल्वे वाहतूक उशिरा, महामार्गावर वाहतूक कोंडी

त्या तरुणीवर हल्ला झाला तेव्हा तिच्या बरोबर असणाऱ्या मित्राने कोयत्याचा पहिला वार सोसला आहे. पहिला हल्ला हा तिच्या मित्रांवर झाला नंतर त्या तरुणीच्या मागे जाऊन तिच्यावर हल्ला केला. आरोपी शंतनू जाधव याच्या रक्ताच्या नमुन्याचे रासायनिक विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याचा रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी