30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसमृध्दीवर अपघाताचे सत्र सुरूच; बुलढाण्याजवळ अपघातात 25 प्रवासी ठार

समृध्दीवर अपघाताचे सत्र सुरूच; बुलढाण्याजवळ अपघातात 25 प्रवासी ठार

समृध्दी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्याजवळ टायर फुटून झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या बसमध्ये अंदाजे 33 प्रवासी असल्याची माहिती मिळते. तर 8 प्रवासी सुखरुप असल्याचं कळतंय. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा येथे मध्यरात्री हा अपघात झाला. नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी बसमध्ये होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. दरम्यान, हा घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून या अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE–1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. नागपूरहून 30 जूनला संध्याकाळी 5 वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. 1 जुलैच्या मध्यरात्री साधारणत: 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. बसच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक फुटल्याने बसआधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले. अचानक बसला आग लागली. डिझेल टॅंकचा स्फोट झाला असून रस्त्यावर डिझेल सांडले आहे. बसमध्ये नागपूरचे प्रवासी जास्त होते. वर्धामधून 14 प्रवासी चढले होते.

हे सुध्दा वाचा:

वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी…; सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे ट्विट

ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट; नाना पटोले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मनीषा कायंदे गेल्या, आता राहुल कनाल शिंदे गटाच्या वाटेवर…..

प्रवाशांची अजून ओळख पटलेली नाही. ट्रॅव्हल्सच्या मालकाकडून प्रवाशांची यादी अजून मिळालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणनेकडून घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली होती. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला असून दुसरा चालक बचावला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी