30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमयह शहर है हादसो का.. एकाच महिन्यात मुंबईत तीन मुलींवर अत्याचाराचे...

यह शहर है हादसो का.. एकाच महिन्यात मुंबईत तीन मुलींवर अत्याचाराचे प्रयत्न

यह शहर है अमन का,
यहा की फिजा है निराली..
असे हिन्दी चित्रपटातील गाणे काही वर्षापूर्वी खूप गाजले होते. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. देशभरातून नागरिक या नगरीत नशीब अजमावला येतात. मेहनत घेणाऱ्या मंडळींना मुंबई भरभरून देते याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. मुंबईमधील बॉलीवूड मुळेही ही मायानगरी अनेक जणांना भुरळ पाडते. राज्यातील सगळ्यात सुरक्षित शहर म्हणून मुंबई ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसात हे शहर ‘हादसो का शहर’ अशीच ओळख निर्माण करते की काय असे वातावरण एकाच महिन्यात मुंबईत तीन मुलींवर अत्याचारचे प्रयत्न झाल्याने निर्माण होत आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, राज्यात सगळेच कुशल चालले असल्याची शेखी ते मिरवत असताना देशाची आर्थिक राजधानी महिलांसाठी सुरक्षित नसल्याची बाब लपून राहत नाही. सत्ता संघर्षानंतर पोलिसांवरील कामाचा ताण वाढला असून त्यातून अशा घटना घडत असल्याची दबक्या आवाजातील चर्चा पोलिस दलात आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी फडणवीस काय उपाय योजतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

6 जून रोजी मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणाऱ्या मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सरकारने एक समिती नेमून अधीक्षकास निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर काही दिवसातच हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान लोकलच्या डब्यात एक तरूणीवर एकाने अत्याचार केला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला होता. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेराची मदत घेऊन काही तासातच आरोपीला अटक केली. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

हे सुध्दा वाचा:

‘गेम चेंजर’ समृद्धी महामार्ग झालाय मृत्यूमार्ग; सात महिन्यात 18 अपघातात 300 ठार

समृध्दी महामार्गावरील बस अपघात नव्हे तर हत्या; शिंदे-फडवणवीसांवर इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

बुलढाणा अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल; ट्विट करत व्यक्त केला शोक

अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. एक महिन्यात तीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याच्या तीन घटना घडल्यानंतर मुंबई एकट्या दुकट्या महिलांसाठी धोकादायक ठरत तर नाही ना, असा सवाल केला जात आहे. लोकलमध्ये महिलांमध्ये होणारे अत्याचार या नव्या घटना नाहीत, या घटनांना पायबंध घालण्यासाठी महिलांच्या डब्यात रात्री 9 ते सकाळी 6 अशी पोलिसांची गस्त असते. मात्र आता दिवसा अशा अत्याचारच्या घटना वाढतच असतील तर दिवसाही पोलिसांची सुरक्षा महिला डब्ब्याला द्या अशीच मागणी महिला प्रवाशाकडून होते. दरम्यान, पोलिसांवर सण, व्हीआयपी सुरक्षा, शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी यांच्या सुरक्षेचा ताण आहे, तो ताण कमी केल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पोलिसाना पुरेसा वेळ मिळेल अशी दबक्या आवाजातील चर्चा पोलिसांमध्ये आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी