30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना?; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खासदार राऊत...

देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना?; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खासदार राऊत यांचा उपरोधिक सवाल

बुलढाणा येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत ट्विट करत, अत्यंत असंवेदनशील सरकार आहे. देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा आणि जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असा उपरोधिक सवाल केला आहे. शिवाय समृध्दी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

या घटनेवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले आहे. ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. हनुमान चालीसा प्रकरणावरून राऊत आणि राणा दाम्पत्यामध्ये दीड वर्षापूर्वी चांगलेच वाजले होते. आता या अपघात प्रकरणावरून राऊत आणि राणा यांच्यात किती दिवस वाद चिघळतो हे पहावे लागणार आहे.

या मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बस ही जळून खाक झाली होती. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाला अडथळे येत होते म्हणून सर्व मृताची ओळख पटण्यासाठी डीएनए चाचणीसाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयात पाठवले. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE–1819 ही बस नवीन होती. या गाडीची कागदपत्रं व्यवस्थित होती. गाडीचा फिटनेस आणि इन्शुरन्स होता. गाडीचा चालक हा जुना असून अनुभवी चालक होता. अशी माहिती मिळत आहे.

हे सुध्दा वाचा:

यह शहर है हादसो का.. एकाच महिन्यात मुंबईत तीन मुलींवर अत्याचाराचे प्रयत्न

‘गेम चेंजर’ समृद्धी महामार्ग झालाय मृत्यूमार्ग; सात महिन्यात 18 अपघातात 300 ठार

खासगी वाहनांच्या वेगमर्यादेची गंभीर दखल घ्यावी; शरद पवार यांच्या सूचना

महाराष्ट्रातील बुलढाणाजवळील समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस खांबाला धडकल्याने आग लागली. ट्रॅव्हल ऑपरेटर्सने सांगितले की बसमधील बहुतेक प्रवासी नागपूर जिल्ह्यातील आहेत. पुण्यातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मुख्य केंद्रांना भेट दिली, ज्यात संगमवाडीचा समावेश होता, जिथे नागपूरहून येणाऱ्या बसेस थांबतात आणि अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सचे तेथे कार्यालय नसल्याचे आढळून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी