30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टने घेतले 300 बळी; समृद्धी महामार्ग झालाय मृत्यूमार्ग

फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टने घेतले 300 बळी; समृद्धी महामार्ग झालाय मृत्यूमार्ग

राज्याची भाग्यरेषा बदलणारा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणारा 14 जिल्ह्यातून जात 24 जिल्ह्यांच्या विकासास उपयुक्त ठरणारा नव्हे तर, ‘गेम चेंजर’ म्हणून ख्याती असणारा समृद्धी महामार्ग महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी बुलढाणाजवळ खासगी बसच्या अपघातात 25 जणांचा हकनाक बळी गेल्यानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या मार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा महामार्ग कमी वेळेत आपल्या गावच्या ठिकाणी जाईल असे अनेकांना वाटत होते, पण उद्घाटनानंतर 7 महिन्यात या महामार्गावर 18 अपघात होऊन 300 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळेच या मृत्यू मार्गावर वाहने सावकाश चालवा असे आवाहन सरकार करत आहे. या महामार्गावर जनावरे आडवी येण्याने, वाहन चालकाच्या हलगर्जीने अपघात होत आहेत.

वाहन चालकांनी काळजी घेऊन वाहने चालवल्यास अपघातचे प्रमाण कमी होईल असे बोलले जात आहे.
मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यापूर्वी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला झाले. या महामार्गावरुन सर्वप्रथम प्रवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारने केला. ती कार फडणवीस यांनी चालवली होती.

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे (महासंपर्क द्रुतगती महामार्ग) प्रकल्प, हे देशभरातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल होते. हा द्रुतगती महामार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार अशा पर्यटन स्थळांना जोडेल. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरेल. असे बोलले जाते, पान तशी वस्तुस्थिती आहे का, असाही सवाल केला जात आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो.

या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल. असे सांगितले जात होते, पण दिवसेंदिवस हा महामार्ग अपघात मार्ग होत चालला आहे. महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीच्या टप्प्यात शौचालय, खाण्यापिण्याची सोय नाही. या बाबतचा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात विचारला होता. तेव्हा सरकारने तातडीने सुविधा पुरवू असे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर काहीच फरक पडला नसल्याची बाब समोर येत आहे. विधिमंडळात महामार्गाच्या असुविधाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने 20 ठिकाणी पेट्रोल पंप, मॉल, हॉटेल्स निर्माण करणार असल्याचे सांगितले होते, ते कामही अद्याप सुरू झाले नाही.

हे सुद्धा वाचा

54 हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मारला मृत्युचा महामार्ग – नाना पटोले

देवेंद्रजी, एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना?; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खासदार राऊत यांचा उपरोधिक सवाल

यह शहर है हादसो का.. एकाच महिन्यात मुंबईत तीन मुलींवर अत्याचाराचे प्रयत्न  

वन्य प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर

समृद्धी महामार्ग हा अनेक जंगल पट्टयातून जात आहे, त्यामुळे अनेक वन्यप्राणी महामार्गावर येत असतात त्यांना वाचवताना वाहन चालकांचे गाडीवरून नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. जालनामध्ये काही महिन्यापूर्वी झालेला अपघात हा नीलगाय वाचवताना घडला होता. त्यात लहान मुलीचा अडीचशे फुटावर फेकली गेल्याने मृत्यू झाला होता. महामार्गाजवळ अन्डर, ओवरपासचे काम झाले नाही, त्यातच महामार्ग सुरू केल्याने वन्य प्राणी महामार्गावर येऊन अपघात होत असल्याचे बोलले जाते. याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी