30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिवसेनेनंतर एक वर्षांनी राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या ३० आमदारांचा सरकारला...

शिवसेनेनंतर एक वर्षांनी राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या ३० आमदारांचा सरकारला पाठिंबा

दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा करून अजित पवार यांचा भाजपकडे जाण्याचा मार्ग रोखत, पक्षात आपणच सुप्रीम असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे साहजिकच अजित पवार बॅक फुटवर गेल्याचे पहायला मिळाले होते. पण रविवारी दुपारी राजभवनावर राजकीय घडामोडी घडल्या अन् अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांसह सरकार पाठिंबा दिला. शिवाय नऊ मंत्रीपदे पडतात पाडून घेत स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधीही उरकला. त्यामुळे राष्ट्रवादीत आता फक्त २४ आमदार उरले असून भविष्यात या प्रकरणाला न्यायालयात आव्हान दिले गेल्यास पक्ष प्रतोद ही अजित पवार यांनी खिशात टाकला आहे. त्यामुळे याला न्यायालयात आव्हान दिले गेल्यास अजित पवार यांचेच पारडे जड असणार आहे.

अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्याने राज्यात आता दोन दोन उप मुख्यमंत्री असतील. शिवाय या वरिष्ठ, अभ्यासू, अनुभवी उपमुख्यमंत्री यांना. न दुखवता शिंदे यांना राज्य शकट हाकावे लागणार आहे. जलसंपदा हे खाते अजित पवार यांना मिळू शकते. येत्या काळात होणारी विधानसभा निवडणूक शिंदे की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. एक वर्षापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष झाले असताना भाजपने शरद पवार यांना खिजवण्यासाठी ३० आमदारांना भाजपात आणून त्यांच्यावरील कलंक पुसून टाकला होता.
राज्याचे राजकारण बेभरवशाचे आहे याचा प्रत्यय आज राज्यातील जनतेला आला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली
तीस आमदारांनी राज्य सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यात विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे केंद्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, शरद पवारांना जवळचे असलेले आमदार नरहरी झिरवाळ, ओबीसी नेते म्हणून मिरवणारे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसेपाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय..वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राजकीय स्थिती होती तेच चित्र आज पुन्हा एकदा पहायला मिळतंय. अजित पवारांसह काही आमदारांनी भाजपसोबत सत्तास्थापनेचा मार्ग निवडलाय. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज चार वर्षांनी २ जुलै २०२३ ला पुन्हा हेच चित्र पहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान देत घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

2024 ची निवडणूक पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वात लढवणार : अजित पवार

अजित पवार यांच्याशिवाय छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, बाबाजी पाटील आदी आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही ? असेही अजित पवार म्हणाले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी