30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयखासदारकीसाठी आनंद परांजपे अजित पवार यांच्याबरोबर गेले; ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना

खासदारकीसाठी आनंद परांजपे अजित पवार यांच्याबरोबर गेले; ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना

शिवसेनेत कोंडी होत असल्याने खासदार असलेल्या आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीत आणले. ठाण्याच्या सुभ्याच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या. पण याच परांजपे यांनी आव्हाड यांना कात्रजचा घाट दाखवत अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परांजपे यांच्यावर चिडले आहेत. खासदारकी मिळावी यासाठी परांजपे अजित पवार यांच्याबरोबर गेले, अशा भावना या कार्यकर्त्यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, कल्याणच्या लोकसभा मतदार संघावर दावा करायचा आणि ठाणे तसेच पालघर हे लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घ्यायचे असे भाजपचे गणित आहे. यात आनंद परांजपेकरिता ठाणे लोकसभेसाठी अजित पवार भाजपला पटवू शकतात, असेही बोलले जात आहे.

शिवसेनेचे अभ्यासू खासदार प्रकाश परांजपे यांचे अकाली निधन झाल्यावर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे यांना शिवसेनेने तिकीट दिले आणि ते चांगल्या मतांनी निवडून आले. त्यानंतर त्यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या लोकसभेत मांडून आपली छाप निर्माण केली होती. ते 2014 पूर्वी शिवसेनेत असताना जिल्हा स्तरावरचे नेतृत्व दखल घेत नसल्याने नाराज होते, पक्षातून काही मंडळी त्यांना त्रास देत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ते संपर्कात आल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर आव्हाड यांनी परांजपे यांची पक्षात होणारी कोंडी घातली आणि परांजपे यांचा राष्ट्रवादीत येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमधून कल्याण आणि ठाणे लोकसभा निवडणुका लढवल्या, पण त्यांना यश काही आले नाही.

हे सुद्धा वाचा:

राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रेनेचं छापेमारीचे सत्र सुरूच, एकाला अटक

बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकावर डागले फोटोअस्त्र

एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी पवारांचे आव्हाड यांना बळ; राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी, पक्ष प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड

परांजपे गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष होते. ते शिवसेनेत जाऊन लोकसभा निवडणूक कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढवण्याची व्यूहरचना होती. पण आनंद परांजपे हे अचानक अजित पवार गटात गेल्याने राष्ट्रवादीच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, कल्याणच्या लोकसभा मतदार संघावर दावा करायचा आणि ठाणे तसेच पालघर हे लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घ्यायचे असे भाजपचे गणित आहे. यात आनंद परांजपेकरिता ठाणे लोकसभेसाठी अजित पवार भाजपला पटवू शकतात, असेही बोलले जात आहे. लोकसभेत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यानुसार परांजपे यांच्यासाठी ठाणे सोडून त्या बदल्यात राष्ट्रवादीकडून एखादा मतदारसंघ भाजपा मागून घेऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी