30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयप्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून हाकलले; पवारांनी सोडले...

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून हाकलले; पवारांनी सोडले ब्रह्मास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधीला हजर राहिलेल्या सर्व नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक काढून हा आदेश जारी केला आहे. असे असतानाच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हाकलण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं. दरम्यान रविवारी पत्रकार परिषदेत पवार यांनी अशा स्वरूपाच्या कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार पवारांनी हे सोडले ब्रह्मास्त्र सोडले आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही खासदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाच्या रजिस्ट्रीमधून त्यांच्या नावाची नोंदणी रद्द करण्यात यावी असा आदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या संसदेतील दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई करत 2 जुलै रोजी झालेल्या शपथविधीला उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर या दोन्ही खासदारांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. या दोन खासदारांनी आणि पक्षाच्या नऊ आमदारांनी पक्षाची कोणतीही संमती न घेता निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा:

मनसेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

शपथविधीला उपस्थित राहणे राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना महागात पडले; सर्व नेते बडतर्फ

शिर्डी, अक्कलकोटसह विविध मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेवत, त्यांना कोणतीही कल्पना न देता या नेत्यांनी काही गोष्टी केल्या. त्यामुळे ते पक्षातून बडतर्फीस पात्र ठरतात. पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी