30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय' गडी एकटा निघाला, 83 वर्षाचा योद्धा', शरद पवार गटाकडून मुंबईत जोरदार...

‘ गडी एकटा निघाला, 83 वर्षाचा योद्धा’, शरद पवार गटाकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची बैठक आणि बांद्रा येथे अजित पवार यांची सभा होणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांनी सकाळी आपल्या पक्षाचे मंत्री आणि आमदार, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी आमदारांना सूचना केल्या. आज मोठे शक्ती प्रदर्शन करा अशा शब्दात अजित पवार यांनी पदाधिकारी मंडळीना सल्ला दिला. तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी एक वाजता शरद पवार आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे, दरम्यान सकाळी साडेदहा वाजता ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हजर झाले. कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र आज किती आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्याबरोबर आहेत हे कळणार आहे. त्यानुसार दोन्ही गटाचे भवितव्य ठरणार आहे. मुंबईत शरद पवार यांची बैठक असल्याने सकाळपासूनच मुंबईत, ‘ गडी एकटा निघाला, 83 वर्षाचा योद्धा ‘ असा आशय असणारे पोस्टर लागले आहेत.

अजित पवार यांनी पक्षात बंड केल्याचा घटनेला 3 दिवस झाले आहे. या तीन दिवसात दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. अजित पवार गटाकडून आमच्याकडे 42 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्री झालेले 9 आमदार सोडून सगळे आमदार आमच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जास्त आमदार तो बाजी मारणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला असून अजित पवार यांच्याकडे गेलेले शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी सकाळी सकाळी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या घरी हजेरी लावून पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. काल माजी राज्यमंत्री तसेच आमदार जयंत पाटील यांचे भाचे आमदार तनपुरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली असताना, उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण तनपुरे यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 पर्यंत कोण कोण आमदार कोणाच्या बरोबर आहे, हे कळणार आहे.

हे सुध्दा वाचा:

धक्कादायक! मुंबईतील वरळी सी-फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्धवट सोडून परतल्याने भाजपवरील नाराजीची जोरदार चर्चा

पदभार सोडताच विभागीय आयुक्त निघाले पायी, साधेपणाचे सर्वत्र कौतुक

अजित पवार यांना सत्तेत घेतल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत असून ते आपल्या आमदारांची बैठक घेत आहेत. या बैठकीत काय ठरते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. एकुणात बुधवारची सुरुवात राजकीय घडामोडीमुळे झाली असून जस जसा दिवस पुढे पुढे सरकत जाईल तस तशा विविध बातम्या आपल्याला वाचायला, पहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी