30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयसत्तेतील वाट्यासाठी रामदास आठवलेंचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

सत्तेतील वाट्यासाठी रामदास आठवलेंचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अवघ्या एक वर्षासाठी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सामावून घेण्यात आले होते. अविनाश महातेकर यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. त्यानंतर चार वर्षापासून आरपीआय आठवले गटाला सत्तासुंदरी हुलकावणी देत आहे. असे असताना आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन केले.  तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सत्तेतील वाट्यासाठी साकडे घातले.

अजितदादा पवार  भाजप शिवसेना रिपाइं महायुती सोबत आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण आज अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. अजितदादा पवार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचे पत्रकारांच्या  एका प्रश्नाला उत्तर देताना ना.रामदास आठवले म्हणाले. अजित पवार सध्या उपमुख्यमंत्री असले तरी ते भावी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्यात अजित पवार यांच्या भोवती प्रसिद्धी वलय आहे. हे आठवले यांना चांगलेच महित असल्याने त्यांच्या भेटीमुळे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर आठवले यांनी मोदी यांना पाठिंबा देत मंत्री पद मिळवले होते. त्यांची एक वोट बँक आहे, त्याचा फायदा भाजपला आणि शिंदे यांच्या शिवसेनेला होत असतो. असे असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आठवले यांना झुलवत ठेवले होते. आठवले गटाला फारसे स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे कार्यकर्ती मंडळीत नाराजी होती.

हे सुद्धा वाचा:

आपले विमान हवेतच जास्त असायचे; रोहित पवार यांची प्रफुल पटेलांवर जळजळीत टीका

अखेर ठरलं! चांद्रयान-3 या दिवशी लॉंच होण्याची शक्यता

ठाकरे बंधु एकत्र येणार का? मनसेचे अभिजीत पानसे राऊतांच्या भेटीला

रामदास आठवले हे कायम शरद पवार यांच्या संपर्कात असणारे नेते म्हणून ओळखले जातात. 1990 मध्ये शरद पवार यांच्या मंत्री मंडळात आठवले समाज कल्याणमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मंत्रालयात कार्यकर्त्यांची गर्दी असायची. ते राज्याच्या राजकारणात सक्रीय असताना दयानंद म्हसके, प्रीतम कुमार शेगावकर आदी मंत्री होते. अखेर अविनाश महातेकर यांना अल्प काळासाठी राज्यमंत्री बनवण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी