30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिवसेना- राष्ट्रवादीनंतर आता भाजपात होणार बंड; पंकजा मुंडे कॉंग्रेसवासी होणार

शिवसेना- राष्ट्रवादीनंतर आता भाजपात होणार बंड; पंकजा मुंडे कॉंग्रेसवासी होणार

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहे. कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेले बंड त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोबत बंड केले. अजित पवारांनी भाजप- शिंदे सरकारसोबत हात मिळवून उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शप्पथ घेतली. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे. या राजकीय उलथापालटला एक आठवडा उलटत नही, तोच आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचा बातम्यांना उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे भाजपाच्या बड्या नेत्या आहेत. त्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण सध्या त्या पक्षावर नाराज आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांने दिली आहे. तसेच पंकजा मुंडेनी दोन वेळा दिल्लीत जाऊन ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात असून कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. तसेच ‘मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे’, असे सूचक विधान देखील पंकजा मुंडे यांनी केले होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पंकजा मुंडेंच्या पक्ष प्रवेशासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे असेही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे सुध्दा वाचा:

सत्तेतील वाट्यासाठी रामदास आठवलेंचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

आपले विमान हवेतच जास्त असायचे; रोहित पवार यांची प्रफुल पटेलांवर जळजळीत टीका

ठाकरे बंधु एकत्र येणार का? मनसेचे अभिजीत पानसे राऊतांच्या भेटीला

सानप म्हणाले की, “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप संपूर्ण देशभरामध्ये रुजवण्याचे काम केले. त्यांच्याच कन्येवर भाजपमध्ये अन्याय होत आहे. याबाबत केसीआर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला, तर केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. पण पंकजांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी