30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रबुलढाणा अपघातात खळबळजनक खुलासा, बसचालक मद्यधुंद अवस्थेत

बुलढाणा अपघातात खळबळजनक खुलासा, बसचालक मद्यधुंद अवस्थेत

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ 1 जुलैच्या रात्री 1.30 दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात झाला होता. बसचालकाच्या संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अहवाल समोर आले आहेत. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी बस होती. विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात हा चालकाच्या चुकीमुळे घडल्याचं समोर आलं आहे. दानिश याच्या शरीरात मद्याचे प्रमाण मान्य क्षमतेनुसार 30 टक्के जास्त होते असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, ही माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे.

बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. विशेष बाब म्हणजे बसचा अपघात हा टायर फुटल्याने झाला असा दावा बसचालक शेख दानिश याने केला होता.

फॉरेन्सिक टीमने बस ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्ताचे सॅम्पल 1 जुलैला दुपारच्या सुमारास घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झालं असावं असे तज्ज्ञांना वाटतं. म्हणजेच अपघात घडला त्यावेळेस ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण अहवालात नमूद करण्यात आलं, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारने, महिन्याभरात केल्या 39 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

शरद पवारच पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तीन खासदारांसह 9 आमदार निलंबित

सत्तेतील वाट्यासाठी रामदास आठवलेंचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे. आता विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातासंबंधी वेगवेगळे अहवाल समोर येत असून हा अपघात मानवी चूक आणि बेजबाबदारपणाने गाडी चालवण्याने घडला असावा, असेच तपशील आता समोर येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख याला अटक करून ताब्यात घेतलं असून त्याच्यावर आयपीसीचे कलम 304 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम 134,184 आणि 279 लावण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी