30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटक्रिकेटचा बादशहा महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

क्रिकेटचा बादशहा महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सर्वांचा लाडका माही हा भारताचा यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनी आज 42 वर्षांचा झाला. सोशल मिडियावर माहीचा चाहता वर्ग खूप आहे. सोशल मिडियावर चाहत्यावर्गाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वर्षाव केला आहे. सोशल मिडियावर चाहते धोनीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. माहीची ओळख फक्त आपल्या देशा पुरती नसून त्यांनी स्वत: ची ओळख भारताबाहेर देखील बनवली आहे. अर्थात धोनीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. फक्त धोनी हे नाव क्रिकेट मर्यादीत पुरते नसून जाहिरात क्षेत्रातही ओळखले जाते.

धोनीने भारतीय संघासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. गेल्या मोसमात त्याने चेन्नईला बाजी मारली. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन ठरला. भारताला T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार धोनी केवळ क्रिकेटच्या मैदानाचा नायक नाही तर मैदानाबाहेरही तो तितकाच प्रसिद्ध आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने सोशल मीडियावर धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले, ‘माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. खेळपट्ट्या सामायिक करण्यापासून ते आमची स्वप्ने सामायिक करण्यापर्यंत, आम्ही निर्माण केलेले बंधन अतूट आहे. एक नेता आणि मित्र म्हणून तुमची ताकद मला मार्गदर्शक शक्ती आहे. येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे, यशाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. चमकत राहा, नेतृत्व करत रहा आणि तुमची जादू पसरवत रहा.’ या मेसेजसोबत रैनाने माहीसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

हे सुध्दा वाचा:

ठाकरे गटाला आणखीन एक जोरदार धक्का; उपसभापती नीलम गोऱ्हे जाणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार साईबाबांचे दर्शन; शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त

शिंदे- फडणवीस सरकारने, महिन्याभरात केल्या 39 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. धोनीने कसोटीत 38.1 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटने 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एमएसने 73 अर्धशतके आणि 10 शतकांसह 10773 धावा केल्या आहेत. याशिवाय टी20 बद्दल बोलायचे झाले तर धोनीने टी20 मध्ये 37.6 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत. त्‍याने टी-20मध्‍ये दोन अर्धशतकही केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी