30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयठाकरे गटाला आणखी एक जोरदार धक्का; उपसभापती नीलम गोऱ्हे जाणार एकनाथ...

ठाकरे गटाला आणखी एक जोरदार धक्का; उपसभापती नीलम गोऱ्हे जाणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

रविवारपासून अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसला एका मागून एक धक्के मिळत आहेत. ते थांबायचे नाव काही घेत असताना आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याशिवाय आमदारांसह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. आज दुपारी गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

शिवसेनेत एक वर्षापासून मोठीच अस्वस्थता आहे. शिंदे यांनी ४० आमदार घेऊन सत्ता सुंदरी मिळवल्याने उरलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेतील आमदार नाराज आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडे इन्कमिंग सुरूच आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच, काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला खिंडीत गाठले होते. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना खडेबोल सुनावले होते, अशी माहितीही समोर आली होती.

त्यानंतर नीलम गोऱ्हेंचा शिंटे गटाकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखरे दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच, नीलम गोऱ्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गटातून आधी विप्लव बाजोरिया, मग मनिषा कायंदे एकनाथ शिंदे गटात गेल्या. आणि आता नीलम गोऱ्हे शिंदे गटात सामील होत आहेत. हा शिवसेना मोठा हादरा मानला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेत 11 आमदार आहेत. त्यापैकी विप्लव बाजोरिया हे आधीच एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदेही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे गेल्या आहेत. विधानसभेचे 40 आमदार आधीपासूनच एकनाथ शिंदेंकडे आहेतच, आता विधान परिषदेचेही 3 आमदार शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील शिवसेनेचं ठाकरे गटाचं जे संख्याबळ आहे, हे 11 वरुन कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार साईबाबांचे दर्शन; शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त

बुलढाणा अपघातात खळबळजनक खुलासा, बसचालक मद्यधुंद अवस्थेत

शिंदे- फडणवीस सरकारने, महिन्याभरात केल्या 39 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी