31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबई'चकली'वरून शीतल म्हात्रे-किशोरी पेडणेकरांमध्ये दिवाळीपूर्वीच टीकेची सुरसूरी

‘चकली’वरून शीतल म्हात्रे-किशोरी पेडणेकरांमध्ये दिवाळीपूर्वीच टीकेची सुरसूरी

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची ईडीकडून (Enforcement Directorate) कथित डेड बॉडी किट बॅग घोटाळा प्रकरणात आज बुधवारी, (8 नोव्हेंबर) ईडी (ED)कार्यालयात चौकशी होणार होती. कोरोना काळामध्ये डेड बॉडी किट बॅग खरेदीच्या प्रकरणात घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावरून, ईडीने किशोरी पेडणेकर यांना चौकशीचे समन्स बजावले होते. तत्पूर्वी, पेडणेकर यांच्या वकिलांनी महत्वाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. तत्पूर्वी, शिवसेना (शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवरुन किशोरी पेडणेकर यांच्यावर खोचक टीका केली. ‘दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार,’ या शब्दांत शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांचे थेट नाव न घेता टीका केली  आहे. किशोरी पेडणेकर यांनीसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना काळात डेड बॉडी किट बॅग खरेदी करण्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 1 हजार 300 रुपये किमतीच्या डेड बॉडी किट बॅगची खरेदी 6 हजार 800 रुपयांत करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी, मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह तीन जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांच्यासह, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासु, खरेदी विभागाचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदान्त इन्फो लिमिटेड यांच्याविरोधात हे आरोप करण्यात आले होते. म्हणुन, किशोरी पेडणेकर यांची चौकशी चालू आहे.

शीतल म्हात्रेंची खोचक टीका

शिवसेना (शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात टीका केली आहे. नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्या आणि विविध मुद्यांवर आपली मते मांडणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी “X” वरुन (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख ‘कचोरी ताई’ असा करत त्या म्हणाल्या,” कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं… दिवा पण फडफडून विझणार वाटतं…”


किशोरी पेडणेकर यांचा पलटवार

किशोरी पेडणेकर यांनीही शीतल म्हात्रे यांना प्रत्युत्तर देत “X” वर ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, “शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेन पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे. मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय????”


एकमेकांवर चाललेले आरोप प्रत्यारोपांचे रूपांतर आता वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे, हे ट्विटरवॉर कुठल्या पातळीपर्यंत जाते हे पहावे लागेल.

हे ही वाचा 

भाजप लोकांची माफी मागणार का? रोहित पवार यांचा सवाल

‘महापालिका निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते…’ संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

सुप्रिया सुळेंनी सुनील तटकरेंना सांगितली आईची माया !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी