28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळेंनी सुनील तटकरेंना सांगितली आईची माया !

सुप्रिया सुळेंनी सुनील तटकरेंना सांगितली आईची माया !

राज्यात एका वर्षांपूर्वी शिवसेनेचे दोन गट पडले आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेही दोन गट पडले आहेत. एका बाजूला काका-पुतण्या आणि दुसऱ्या बाजूला दादा-ताई अशा भावनिक नात्याचा परिणाम आता राजकीय पातळीवर होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट हे आपापल्या विरोधात आहेत. अशातच आता काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांच्यावर याचिका दाखल केली असून चार महिने निघून गेले आहेत. मात्र अजूनही यावर निर्णय नसल्याने शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला.

सुनिल तटकरेंनी आपल्या पक्षाशी गैरव्यवहार केल्याचे सुप्रिया सुळेंचे म्हणणे आहे. यावर आता सुळेंनी सुनिल तटकरेंवर संताप व्यक्त केला आहे. आपल्या आईशी कोणी गैरव्यवहार करत नाही आणि पक्ष ही आई असते. त्यात जर कुणी चुक करत असेल, गैरव्यवहार करत असेल तर याविरोधात संसदेच्या अध्यक्षांच्या कायद्याप्रमाणे आणि नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी चार महिन्यांपूर्वी सुनिल तटकरेंवर याचिका दाखल केली होती. मात्र अजूनही यावर कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याने सुप्रिया सुळे तटकरेंवर कडाडल्या आहेत.

हे ही वाचा

फडणवीसांच्या प्रतिमेसाठी भाजपचा व्हिडीओ

‘ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला’

डॉ. ओमप्रकाश शेटे आयुष्मान भारत अभियानाचे नवीन कक्ष प्रमुख

अद्याप कोणतीही कारवाई नाही

न्यायालयीन लढाई लढल्याने लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना न्याय मिळाला. आम्ही पक्षासाठी न्याय मागत आहे. महिला विधेयक मांडताना उपस्थिती दाखवली नाही. पक्षाच्या विरोधात जाण्याची भुमिका असून गेली चार महिने झाली आहेत. मात्र अजूनही याचिकेवर कोणतीच सुनावणी झाली नाही. यावर कार्यवाही केली जात नसल्याने शेड्युलचे उल्लंघन होत आहे. दिल्लीत अदृश्य शक्ती आहे, असे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले होते. दिल्लीतील अदृश्य शक्ती यांच्या मागे उभी आहे आणि त्यामुळे हे सर्व सुरू आहे. मी डेटा घेऊन सांगू शकते की महाराष्ट्राविरोधात अदृश्यशक्ती कशी आहे. मी आरोप करून शांत बसणार नाही.

सुप्रीम कोर्ट हे सुनावणीबाबत खूपच नाराज आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने लाईव्ह पाहिले आहे. यामुळे मी काही वगळे सांगत नाही. देश हा नियम आणि कायद्याने चालतो, अदृश्य शक्तीने नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. न्याय मिळत नसेल तर संघर्ष करावा लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी